पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मोटार विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले होते. यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कारवाईत शहरातील रस्त्यांवर विनानोंदणी धावणारी वाहने आढळली. ही वाहने विनानोंदणी थेट ग्राहकांच्या हाती देणाऱ्या वितरकांवर केवळ १० दिवस व्यवसाय परवाना निलंबनाची कारवाई आरटीओने केली आहे. त्यामुळे या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

आरटीओने २२ मे ते १ जून या कालावधीत तपासणी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत ११ विनानोंदणी वाहने आढळली. त्यानंतर ग्राहकांच्या हाती विनानोंदणी वाहने देणाऱ्या ११ वितरकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यात पुणे आरटीओच्या हद्दीतील ६, सातारा आरटीओ ३ आणि अकलूज व श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रत्येकी एक अशा ११ वितरकांचा समावेश होता. पुण्याबाहेरील वितरकांबाबत संबंधित आरटीओंना कळविण्यात आले. या प्रकरणी पुण्यातील ६ वितरकांचा व्यवसाय परवाना ८ ते १७ जुलै या कालावधीत केवळ १० दिवसांसाठी निलंबित करण्यात आला.

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
deportation action against criminals is on paper only
पुणे : तडीपारीची कारवाई कागदावरच; तडीपार गुन्हेगारांचा सर्रासपणे शहरात वावर
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
champions of the earth award madhav gadgil
माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार

हेही वाचा >>>पिंपरी- चिंचवडमध्ये अपघाताच सत्र थांबता थांबेना!; निगडित चारचाकीने दोघांना दिली धडक

वितरकाने नोंदणी करूनच वाहन ग्राहकाच्या हवाली करावे, असा नियम आहे. या नियमाचे उल्लंघन करून वितरकांनी नोंदणी न करता वाहन थेट ग्राहकांना दिल्याचे निदर्शनास आले. अशा वितरकांवर कारवाईचे अधिकार आरटीओला आहेत. त्यांचे व्यवसाय प्रमाणपत्र ६ महिन्यांपर्यंत रद्द केले जाऊ शकते. प्रत्यक्षात पुण्यातील सहा वितरकांवर केवळ १० दिवसांची परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.

कारवाईबाबत मतभिन्नता

वितरकाला व्यवसाय परवाना निलंबनाच्या कालावधीत वाहन विक्रीसह इतर व्यवसाय करता येत नाहीत, असे आरटीओचे म्हणणे आहे. याच वेळी कारवाई झालेल्या वितरकांनी वेगळीच माहिती दिली. ‘निलंबनाच्या कालावधीत आम्ही नोंदणीसाठी पाठविलेल्या वाहनांची नोंदणी तेवढी आरटीओने केली नाही, आमचे इतर व्यवसाय सुरू होते,’ अशी माहिती वितरकांनी दिली. त्यामुळे वितरकांवर नेमकी काय कारवाई झाली, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

Story img Loader