आपल्या घराचा एक भाग म्हणजे आपली बाग. बागेतील वेगवेगळ्या घटकांची रचना बागेची शोभा वाढवते. कुंडय़ांमधील विविधता व त्यांची मांडणी यामुळे बागेची शोभा तर वाढतेच; शिवाय त्यातील बदल आपल्यालाही सतत नावीन्याचा आनंद देते. कुंडय़ांची रचना वेगवेगळ्या पद्धतीत करता येते. काही कुंडय़ा जमिनीवर, काही पायऱ्यांवर, एखादी कुंडी शोभिवंत दगडावर, जुन्या जात्यावर अथवा वाळक्या ओंडक्यावर ठेवता येते. तर, कधीकधी या कुंडय़ा हवेतही टांगता येतात. फॅब्रिकेटेड कुंडय़ांना अडकवलेली ही शिंकाळी म्हणजे हिरवी झुंबरे. छोटी बाल्कनी व सोसायटी पाìकग किंवा बंगल्यांच्या झाडांवरती ही झुंबरे शोभून दिसतात व जागाही वाचवतात. झाडांच्यासुद्धा आवडीनिवडी असतात. तसेच प्रत्येकाची वाढण्याची सवयही वेगळी असते. काहींना सरळ वर जायला आवडते, तर काहींना जमिनीवर धावायला आवडते, तर काहींना वरून खाली झेपावयाला आवडते. त्यांच्या आवडीनुसार व आपल्या जागेच्या उपलब्धतेनुसार झाडांची निवड करावी लागते. छोटय़ा बाल्कनीत रांगेने झाडे ठेवली तर मर्यादित झाडे बसतात ,त्यामुळे बाल्कनीच्या स्लॅबला हुक लावून त्यात कुंडय़ा अडकवता येतात. त्यासाठी तारेच्या बास्केट किंवा प्लॅस्टिकच्या कुंडय़ा मिळतात. या कुंडय़ा किंवा टोपल्यांचा आकार सहा  सहा  सहा पेक्षा जास्त मोठा नसावा. या टोपल्याच्या आत पूर्वी मॉस भरत असत. पण आता मॉस काढण्यावर बंदी आहे, कारण त्याने ऑíकडसारख्या वनस्पतींचे अधिवास नष्ट होतात. त्यामुळे या कुंडय़ा भरण्यासाठी तळास नारळाच्या िपजलेल्या शेंडय़ा (कॉयर), नारळाच्या झाडाच्या बुंध्याचे वल्कल किंवा जुने ज्युटचे पोते वापरावे. त्यामध्ये तीन भाग कोकोपीथ व एक भाग सेंद्रिय माती वापरून कुंडी भरून घ्यावी. कोकोपीथ घातल्याने ओल धरून ठेवण्यास मदत होईल व प्लॅस्टिकच्या कुंडीत हवा चांगली खेळती राहील. या टोपल्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावता येतात. स्पायडर प्लँट हे पांढऱ्या, हिरव्या रिबिनींचे चिमुकले रोप खूप लोकप्रिय आहे. कारण हे घरात कमी उन्हात तसेच बाहेरही छान वाढते. ही रोपे टोपलीत लावून ती आकडय़ास लटकवावी. झाडांच्या मुळांपासून नवीन रोपं वाढतात व टोपली गच्च भरते. मुळांपासून नाजूक काडय़ा फुटतात व या काडय़ांना रोपांचे फुटवे येतात. ही छोटी छोटी लोलकासारखी लटकलेली रोपं टोपलीची शोभा वाढवतात. यामध्ये नाजूक पानांची, हिरव्या पानांना पांढऱ्या कडांची अशी विविधता आढळते. टोपल्यांमध्ये लावण्यासाठी फर्नचा वापरही छान होतो. बारीक, नक्षीदार पानांची पोपटी रंगांची फर्न्‍स बाल्कनीला तजेला देतात. फर्नला सावली आवडत असल्याने पोर्चमध्ये, कमी उन्हाच्या बाल्कनीत जरूर लावावीत.

पुदिन्याच्या कुटुंबातील पण वास नसलेला व गोलाकार पाने असलेला मिंट, याला जमिनीवर लावल्यास आडवे पसरायला आवडते अन् शिंकाळ्यात लावले तर सरसर खाली उतरते. याला पाणी आवडते. त्यामुळे कुंडी भरताना कोकोपीथबरोबर थोडय़ा बारीक चिंध्या कुंडीत घालाव्यात ज्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा ताण बसला तर रोप शॉकमध्ये जाणार नाही. मिंटची वाढ जोमाने होते. काडय़ा लावून रोपे येत असल्याने कुंडय़ा वाढवायला सोपे पडते. पाने तजेलदार दिसतात. एक टोपली वर, एक टोपली खाली अशी रचना केल्यास हिरवे तोरण अथवा पडदा होऊ शकतो. जाड बांबूचे एक एक फुटाचे तुकडे करून मधल्या पोकळीत माती भरून हे बांबूचे तुकडे आकडय़ाला लटकवू शकतो. मिंट यात छान वाढते. मिंटप्रमाणेच मनी प्लँट, आयव्ही यांचीही शिंकाळी छान दिसतात. त्रिकोणी, जांभळ्या पानाचा ऑक्झॅलिससुद्धा शिंकाळ्यात छान वाढतो आणि सुंदर दिसतो. शिंकाळ्यासाठी अतिशय लोकप्रिय आहे डाँकीज् टेल. ही मांसल पानांची छोटी रोपे कुंडीतून एक-दीड फूट खाली उतरतात. ही भरगच्च कुंडी अतिशय आकर्षक दिसते. याच्या छोटय़ा तुकडय़ापासून नवीन रोपे करता येतात. वाटिकांमध्ये याची तयार शिंकाळी मिळतात पण महाग असतात. पेल्टोफोरमच्या तुकतुकीत पानाच्या अनेक जाती शिंकाळ्यात शोभतात. फारशी देखभाल न करता सावलीत छान वाढतात. आयपोमिया व रताळ्याचे वेलही शिंकाळ्यासाठी वापरता येतात. शिंकाळ्यात पाने तर शोभतातच, पण विविधरंगी फुलांची शिंकाळी बागेत अधिक उठावदार दिसतात. ऋतुमानाप्रमाणे फुलांमधला बदलही छान वाटतो. पोर्टुलाका या कुटुंबातील बहुतेक सदस्य शिंकाळ्यात छान वाढतात. किंचित मांसल पानांचा केशरी पिवळा, राणी रंगातला एकेरी, दुहेरी अतिशय तलम फुले असलेला पोर्टुलाका अतिशय सहज रुजतो. वाटिकेत रोपं मिळतात. काडी खोचूनही नवीन रोप करता येते. याचा रानातला भाऊ म्हणजे घोळ. घोळ बागेत तण म्हणून येतं. मात्र, याची आंबटसर भाजी छान लागते. नाजूक पिवळी फुले दिसतातही छान, पण हे शिंकाळ्यात शोभत नाही. बालसम, पिटुनिया, लालुंग्या पानांचा बेगोनिया यांच्यासुद्धा लटकणाऱ्या टोपल्या सुंदर दिसतात. बारीक पाने, नाजूक फुले, आडवी वाढणारी अथवा उंचीवरून खाली पडायला आवडणारी झाडे शिंकाळ्यासाठी योग्य ठरतात. जाळीच्या टोपल्या असल्या तर त्यांना वरचेवर पाणी घालावे लागते. हे पाणी घालताना काळजीपूर्वक घालावे. इमारतीच्या भिंतीवर अथवा लोकांच्या बाल्कनीत पाणी व माती जाणार नाही याची दक्षता घ्यावी. प्लॅस्टिकची शिंकाळी असल्यास त्याला भोकं नसल्याने पाणी साठून मुळे कुजण्याचा धोका असतो. त्यासाठी अधेमधे शिंकाळी काढून माती थोडीशी मोकळी करावी. ज्या आकडय़ास शिंकाळी अडकवले असतील ते पक्के आहेत ना याची खात्री करावी. छोटय़ा बाल्कनीत वेगवेगळ्या प्रकारची फुलांची व पानांची ही हिरवी झुंबरे वाऱ्यावर हळूवार झुलतात व आपल्याला आणि इतरांनाही आनंद देतात.

Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rose Winter Care: 7 Tips To Take Care of Your Rose Plants In Cold Weather
हिवाळ्यातसुद्धा गुलाबाच्या झाडावर उमलतील टवटवीत फुले; रिझल्ट बघून आनंदून जाल, बहरून जाईल घर, जाणून घ्या टीप्स
vasai virar palghar forest declined
शहरबात : उरलेल्या वसईला एकदा बघून घ्या…
Kalyan-Dombivli Municipal corporation,
महाराष्ट्रातून कोठूनही पाहता येणार कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या
msrdc first step to get shaktipeeth project underway
‘शक्तिपीठ’ला पुन्हा बळ; राज्य सरकारचा हिरवा कंदिल
vasai palghar forest area
वसई, पालघरचे वनक्षेत्र ३५ टक्क्यांनी घटले, भूमाफियांकडून जंगलतोड
Shegaon taluka , Nandura taluka , hair fall ,
भय तिथले संपत नाही… केसगळती, टक्कल साथीचा शेजारी तालुक्यातही शिरकाव; रुग्णसंख्या दीडशेच्या घरात

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

Story img Loader