पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटी, टायपिंग आदी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आले आहेत. अशी बनावट प्रमाणपत्रे रोखण्यासाठी आता राज्य परीक्षा परिषदेकडून सर्व परीक्षांची प्रमाणपत्रे डिजिटल पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व प्रमाणपत्रांमध्ये डिजिटल स्वाक्षरी आणि क्यूआर कोड वापरण्यात येणार आहे. डिजिटल प्रमाणपत्रांमुळे परीक्षा परिषदेची आर्थिक बचतही होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

परीक्षा परिषदेकडून देण्यात येणारी सर्व प्रमाणपत्रे ऑनलाइन देण्यासह त्यांची पडताळणी क्युआर कोडच्या माध्यमातून संबंधित संस्था, तसेच अधिकारी स्तरावर केली जाईल. पहिल्या टप्प्यात फेब्रुवारीमध्ये झालेल्या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षेसाठी टायपिंग व लघुलेखन विषयासाठी एकूण ६२ हजार ७०६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या विद्यार्थ्यांपैकी ४९ हजार ४८२ (उत्तीर्ण) विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि १२ हजार २२४ (अनुपस्थित, अनुत्तीर्ण आणि राखीव) विद्यार्थ्यांना गुणपत्रक आयुक्तांच्या डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाइन स्वरुपात संबंधित संस्थांना संस्था लॉगिनद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या पुढे परीक्षा परिषदेमार्फत होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र, गुणपत्रक दिले जाईल. सध्या उपलब्ध माहितीनुसार संबंधित संस्थांना संस्था लॉगिनद्वारे प्रमाणपत्र, गुणपत्रक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मात्र पुढील परीक्षेवेळी विद्यार्थ्यांचा ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक घेऊन थेट उमेदवारांच्याच ई-मेलवर प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे.

हेही वाचा – मुंबई, पुण्यात मोसमी पाऊस सुरू, एकाच दिवसांत व्यापला देशाचा मोठा भाग

डिजिटल प्रमाणपत्रांमुळे परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत संबंधित उमेदवारांना प्रमाणपत्र, गुणपत्रक उपलब्ध होईल. सध्यस्थितीत उमेदवारांपर्यंत प्रमाणपत्र पोहोचण्यासाठी किमान एक ते दोन महिने लागतात. यापूर्वीच्या परीक्षा प्रमाणपत्र वितरणातील गैरप्रकार लक्षात घेता डिजिटल प्रमाणपत्रावर डिजिटल स्वाक्षरी असल्याने आपोआपच गैरप्रकाराला आळा बसेल.

हेही वाचा – पुणे : वीज मीटरसाठी लाच मागणाऱ्या सहायक अभियंता महिलेला अटक, महावितरणच्या धानोरी कार्यालयात कारवाई

विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र हे कायमस्वरुपी संकेतस्थळावर उपलब्ध राहणार असल्याने त्याची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची आवश्यकता राहणार नाही. डिजिटल प्रमाणपत्र, गुणपत्रकामुळे यापूर्वीच्या ऑफलाइन पद्धतीमधील प्रमाणपत्र छपाई, प्रमाणपत्र पाठवणे, वाहतुकीच्या खर्चात बचत होणार आहे.