पुणे: विमानतळात प्रवेश करणे आणि तेथील सुरक्षा तपासणी सुटसुटीत व्हावी या हेतूने डिजियात्रा सुविधेचा वापर मागील वर्षी १ डिसेंबरला सुरू झाला. ‘डिजियात्रा’च्या माध्यमातून ‘फेशिअल रेकग्नेशन’ तंत्राच्या साहाय्याने प्रवाशांची ओळख पटवली जाऊ लागली. या सुविधेचा २० जूनपर्यंत १७ लाखांहून अधिक प्रवाशांनी वापर केला. याचवेळी डिजियात्रा उपयोजन (अ‍ॅप) वापरकर्त्यांच्या संख्येने दहा लाखांचा टप्पा गाठला आहे.

देशाचा विचार करता दिल्ली विमानतळावर डिजियात्रा सुविधेचा सर्वाधिक वापर झाला. दिल्ली विमानतळावर या सुविधेचा वापर करणाऱ्यांची संख्या ६ लाख ४८ हजार आहे. त्याखालोखाल बंगळुरू विमानतळावर ५ लाख ३ हजार आणि वाराणसी विमानतळावर २ लाख २५ हजार प्रवाशांनी वापर केला आहे. वाराणसी विमानतळावर या सुविधेचा वापर करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण इतर विमानतळांपेक्षा जास्त आहे. पुणे विमानतळ १ लाख ४ हजार प्रवाशांची डिजियात्राचा वापर केला आहे. ही संख्या कोलकता १ लाख ८० हजार, विजयवाडा विमानतळ ४६ हजार, हैदराबाद ३७ हजार अशी आहे.

Immigration policy of Donald Trump
अन्यथा : प्रगतीच्या प्रारूपाचा प्रश्न!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर

हेही वाचा… रेल्वेकडून शिवाजीनगर, चिंचवडसह पाच वाहनतळांचे चुटकीसरशी लिलाव

डिजियात्रा सुविधा मागील वर्षी डिसेंबर महिन्यात दिल्ली, बंगळुरू आणि वाराणसी विमानतळावर सुरू झाली. त्यानंतर विजयवाडा, कोलकता, हैदराबाद आणि पुणे विमानतळावर यावर्षी एप्रिलमध्ये ही सुविधा सुरू झाली. देशभरात या सात विमानतळांवर ही सुविधा उपलब्ध असून, आगामी काळात ही इतर विमानतळांवर सुरू होणार आहे.

हेही वाचा… इमारतीच्या खड्ड्यात पडलेल्या सफाई कामगाराला अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवदान

\डिजियात्राचा वापर सुरू झाला तरी सध्याची पुणे विमानतळात प्रवेश करणे आणि सुरक्षा तपासणीची व्यवस्था कायम आहे. प्रवाशांना डिजियात्रा अथवा सध्या सुरू असलेल्या पद्धतीपैकी एकाची निवड करावी लागते. जास्तीत जास्त प्रवाशांनी डिजियात्राचा वापर करावा, असा विमानतळ प्रशासनाचा प्रयत्न आहे. आधी देशातील तीन विमानतळांवर डिजियात्रा सुविधेचा वापर होत होता. दिल्ली, बंगळुरू आणि वाराणसी विमानतळावर ही सुविधा मागील वर्षी डिसेंबरपासून सुरू झाली. ही सुविधा असणारे पुणे हे चौथे विमानतळ ठरले. याच वेळी कोलकता आणि विजयवाडा या विमानतळांवरही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

डिजियात्राचा वापर कसा होतो?

प्रवाशांना मोबाइलवर डिजियात्रा ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागते. प्रवासी त्याचे ओळखपत्र आणि प्रवासाशी निगडित कागदपत्रे त्यात ठेवू शकतो. विमानतळावर पोहोचल्यानंतर फेशिअल रेकग्नेशन तंत्राद्वारे प्रवाशाची ओळख पटवली जाते. त्याच वेळी प्रवाशाच्या ओळखपत्रांचीही तपासणी होते. त्यामुळे प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी होऊन विमानापर्यंत पोहोचण्याचा वेळही कमी होतो.

डिजियात्रा उपायोजनाचे वापरकर्ते १० लाखांवर

डिजियात्रा उपयोजनाचा वापर करणाऱ्यांची संख्या २० जूनला १० लाखांच्या पुढे गेली. यात अँड्राईड वापरकर्ते ८ लाख ६६ हजार असून, त्यांनी उपयोजनाला ४.१ मानांकन दिले आहे. आयओएस वापरकर्ते १ लाख ५४ हजार असूनही त्यांनी उपयोजनाला ४१. मानांकन दिले आहे.