पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे ९ आमदारांसह २ जुलै रोजी सहभागी झाल्याच्या घटनेला जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला. या दरम्यान राज्यात होणार्‍या अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले. शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्रित यावे, अशी भावना अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – वर्धा : जमनालाल बजाज संस्थेची दुर्बल शाळांना दहा कोटींची मदत

हेही वाचा – वाशिम : वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना; सिग्नल यंत्रणाही कुचकामी!

या सर्व घडामोडींदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यातील शिवाजीनगर येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे यांनी भेट घेऊन दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या. दोघांमध्ये काही काळ चर्चादेखील झाली. तर शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.