गृहमंत्री वळसे पाटील यांचे सूचक विधान

पुणे : भाजपकडून चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी के ल्या जात आहेत, असे सूचक विधान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी के ले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) टाकलेले छापे आणि राज्य भाजपच्या कार्यकारिणीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी करावी, अशा स्वरूपाचा केलेला ठराव याबाबत पाटील यांनी हे विधान केले.

करोना सद्य:स्थिती आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, ‘अनिल देशमुख आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या निवास्थानांवर ईडीने शुक्रवारी छापे टाकले. याबाबत जास्त बोलू इच्छित नाही. संबंधित यंत्रणा तपास करत आहे.    दरम्यान, भाजपने कार्यकारिणीत उपमुख्यमंत्री पवार यांची सीबीआयने चौकशी करावी, असा ठराव मंजूर केल्याबाबत ते म्हणाले, ‘भाजपने आपल्या कार्यकारिणीत कोणते ठराव मंजूर करायचे, हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणी मागणी के ली म्हणून लगेच उद्या तसे होईल, असे नाही. राज्यात सीबीआयला चौकशीला यायचे असल्यास राज्य सरकारची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. भाजपकडून चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी के ल्या जात आहेत.’

शासकीय यंत्रणांचा गैरवापर ही त्यांची कार्यशैली

राजकारण हे विचारांचे असते आणि ते जनतेच्या सेवेसाठी असते. आजपर्यंत देशात शासकीय यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी झालेला पाहिला किं वा ऐकलेला नाही. शासकीय यंत्रणांचा गैरवापर ही त्यांची कार्यशैली असल्याचे दिसत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे नाव न घेता के ली. भाजपच्या सत्तेत पवार साहेबांनाही नोटिस आली होती. महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर कधीही विरोधकांना त्रास देण्यासाठी के ला गेला नाही. ही नवीन कार्यशैली आली आहे, असेही सुळे म्हणाल्या.

Story img Loader