पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात घरगुती सांडपाणी आणि रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधिमंडळात दिली. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जिल्हा परिषदेला योग्य कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

विधिमंडळ अधिवेशनात खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी हा प्रश्न विचारला होता. खडकवासला धरणाच्या जलाशयात विनाप्रक्रिया घरगुती सांडपाणी तसेच रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याचे एप्रिल महिन्यात निदर्शनास आले आहे. या दूषित पाण्याच्या वापरामुळे परिसरातील नागरिक, प्राणी, वनस्पती आणि पक्ष्यांवर विपरित परिणाम झाला किंवा कसे? असा प्रश्न तापकीर यांनी उपस्थित केला होता.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी
Vishal Gawli Sakshi Gawli the killers of a minor girl in Kalyan remanded in police custody till January 2 kalyan news
कल्याणमधील अल्पवयीन मुलीचा मारेकरी विशाल, साक्षी गवळीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ८ ऑगस्ट आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या १३ ऑगस्टच्या अहवालानुसार ही बाब निदर्शनास आलेली नाही, असे कळविले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तरात म्हटले आहे. मात्र, खडकवासला जलाशय परिसरात हवेली तालुक्यातील मौजे गोऱ्हे बुद्रुक, मालखेड, खानापूर, डोणजे, कुडजे, मांडवी खुर्द, मांडवी बुद्रुक, सांगरून या गावांमधून निर्माण होणारे सांडपाणी तसेच काही प्रमाणात घरगुती घनकचरा विनाप्रक्रिया खडकवासला धरणात जातो. या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये धरणांतून उचलण्यात येणाऱ्या पाण्यातील कॉलिफॉर्म आणि ई कोलाय या जीवाणूचे प्रमाण घातकरीत्या वाढत आहे. साधारण १५ वर्षांपूर्वी या जीवाणूंचे प्रति १०० मिलि. मधील प्रमाण ८०० ते ९०० इतके होते. मात्र, ते आता दीड लाखापर्यंत वाढले आहे. टेमघर धरणातून उचलण्यात येणाऱ्या पाण्यात जीवाणूंचे प्रमाण अधिक आहे, तर खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणातील जीवाणूंचे प्रमाणही धोकादायकरीत्या वाढत आहे. साठून राहिलेले पाणी, मैलामिश्रित पाण्यामध्ये हे जीवाणू अधिक वेगाने वाढतात. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर फार्महाउस, हॉटेल आणि घरांचे प्रमाण वाढले आहे. सांडपाणी वाहिन्यांची व्यवस्था नसल्याने या ठिकाणी वापरण्यात येणारे पाणी ओढे-नाल्यांमध्ये सोडण्यात येते. तेथून ते धरणामध्ये येत असल्यानेही धोका वाढत असल्याचे मत अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पुणेकरांचे पिण्याचे पाणी शुद्धच

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येमुळे धरणातील पाणी दूषित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खडकवासला धरण साखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांतून शहराला पाणीपुरवठा होतो. धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी उचलले जाते. या पाण्याबरोबरच धरणातून दररोज २१ टन गाळही येतो. पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये हा गाळ वेगळा केला जातो. त्याचप्रमाणे जलशुद्धीकरण केंद्रावर अत्याधुनिक पद्धतीने पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. त्यामुळे प्रत्यक्षात पुणेकरांना पुरविण्यात येणारे पाणी शुद्ध आणि पिण्यायोग्यच असून, त्याचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्टीकरण महापालिकेकडून देण्यात आले आहे.

Story img Loader