पुणे : पुणे शहरातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुस्तक महोत्सवाला राजकीय, सामाजिक, साहित्यिक, कला आणि विद्यार्थी या वर्गातील मंडळींनी हजेरी लावून पुस्तक खरेदी केली आहेत. पण आज नृत्यांगना गौतमी पाटील यांनी हजेरी लावून काही पुस्तके देखील खरेदी केली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक राजेश पांडे, दिग्दर्शक आणि कलाकार प्रविण तरडे यांनी तिचे स्वागत देखील केले. तसेच यावेळी प्रविण तरडे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची ‘फकिरा’ कादंबरी सह अन्य दोन पुस्तके भेट दिली.
आणखी वाचा-पिंपरी : निळ्या पूर रेषेतील जुन्या अधिकृत बांधकामांना वाढीव ‘टीडीआर’…
यावेळी गौतमी पाटील म्हणाल्या की, राज्यातील अनेक भागात आजवर डान्स शो करीता जात आहे. मला प्रत्येक ठिकाणी नाचण्यास बोलवल गेलं आहे. पण पहिल्यांदा पुस्तक वाचण्यास बोलवलं आहे. हा कार्यक्रम प्रविण तरडे यांनी घडवून आणला आहे, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. तसेच माझ्या शिक्षणाबाबत सर्वांना माहीती असून मला पुस्तक वाचण्याची संधी मिळाली नाही. पण आज पुणे शहरात आयोजित केलेल्या पुस्तक महोत्सवामधून काही पुस्तके घेऊन जाईल आणि मला ज्यावेळी कार्यक्रमामधून वेळ मिळेल. तेव्हा नक्कीच पुस्तक वाचेल, तसेच आजवर केवळ डान्स करीत आले आहे. पण आयुष्यात आज काही तरी वेगळ घडतंय, याबद्दल मला खूप आनंद होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.