पुणे शहरात मागील काही महिन्यापासून कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अशा घटना घडू नये यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली. पुण्यातील एसआरपीएफ,ग्रुप, रामटेकडी येथे ३३ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी त्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त, संदीप कर्णिक यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- तरुण असे का वागतात? पुण्यात कोयता गॅंगच्या कहराच्या पार्श्वभूमीवर मानसोपचारतज्ज्ञांनी दिली ‘ही’ माहिती

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गॅंगकडून दहशत माजवल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील कोयता गँग विरोधात पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली असली. तरी अद्याप ही हातात कोयते नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच काम काही जण करत असल्याचे समोर आले आहे. तसेच राज्यातील पोलीस उपअधीक्षक यांच्या बदल्या अद्याप ही प्रलंबित आहेत. त्या प्रश्नावर रजनीश शेठ म्हणाले की, पोलीस उपअधीक्षकाच्या बदल्या लवकरच होतील.त्या संदर्भात गृह विभागामार्फत पावल उचलण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director general of police rajnish sheth informed that a special team of pune police will be appointed against koyta gang svk 88 dpj
First published on: 11-01-2023 at 19:06 IST