पुणे : नगर ररस्त्यावरील बीआरटी मार्ग काढण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि खासदार यांच्यातील विसंवाद पुढे आला आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका प्रशासनाने नगर रस्ता बीआरटी मार्ग काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. बीआरटी मार्ग काढण्याऐवजी तो सक्षम करावा, अशी मागणी ॲड. वंदना चव्हाण यांनी केली आहे.

नगर रस्त्यावरील येरवडा (गुंजन चौक) ते विमाननगर फिनिक्स मॉलपर्यंतचा बीआरटी मार्ग काढण्याच्या कामाला गेल्या शनिवारी प्रारंभ करण्यात आला. मेट्रोच्या कामामुळे बीआरटीचा सर्व मार्ग बंद होता. नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गामुळे वाहतूककोंडी होत असल्याबाबत सातत्याने टीका होत होती. याबाबत स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांनी हा प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या रस्त्याची पाहणी करून बीआरटीविरोधात भाष्य केले होते. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि वाहतूक पोलीस यांच्यात चर्चा करून या मार्गावरील बीआरटी काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय चुकीचा असल्याचे ॲड. वंदना चव्हाण यांनी म्हटले आहे. बीआरटी मार्ग वेगवान, सुरक्षित आणि सक्षम करण्याऐवजी महापालिका मार्ग काढून टाकण्याची विसंगत कृती करत असून नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग पूर्ववत करावा, अशी मागणी ॲड. वंदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ramesh Bidhuri on Delhi CM Atishi
Ramesh Bidhuri : “दिल्लीच्या रस्त्यांवर हरिणीप्रमाणे…”, भाजपाच्या रमेश बिधुरींचं पुन्हा मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य
Pedestrian subway unsafe Demand to appoint security guards Pune news
पिंपरी-चिंचवड: पादचारी भुयारी मार्ग असुरक्षित; सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
aaditya Thackeray
राज्य सरकारकडची थकीत रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करा, आमदार आदित्य ठाकरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
kalyan MNS citizens road agaitationTruck crushes mother, child
कल्याणमध्ये ट्रकने आई, मुलाला चिरडले; मनसेसह नागरिकांचे रस्ता रोको

हेही वाचा – मेट्रोमुळे पुण्याला पूरस्थितीचा धोका? पाटबंधारे विभागाकडून पाहणी सुरू

वाहतूककोंडी होत असल्याने बीआरटी मार्ग हटविणे हा योग्य निर्णय नाही. खासगी वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूककोंडी होत आहे. खासगी वाहनांना शिस्त लावण्यासाठी कोणत्याही उपाययोजना महापालिका प्रशासनाकडून राबविल्या जात नाहीत. रस्ते अतिक्रमणाने वेढले असल्याचेही दिसून येत आहे. बीआरटी मार्गाचा नोकरदार, विद्यार्थी, महिला प्रवाशांना मोठा फायदा होत होता. मात्र मार्ग हटविण्यामुळे लाखो प्रवाशांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे बीआरटी मार्ग हटविण्याऐवजी तो अधिक गतिमान, सुरक्षित करण्याला प्राधान्य द्यावे, असे ॲड. वंदना चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader