लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : महापालिका निवडणूक अनिश्चिततेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडीच्या उत्सवावर विरजण पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दर वर्षी औद्योगिकनगरीत मोठ्या जल्लोषात, उत्साहात साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवाबाबत यंदा मात्र निरुत्साह दिसत आहे. निवडणुकीची शक्यता धूसर असल्याने अनेक माजी नगरसेवकांनी खर्चासाठी हात आखडता घेतल्याचे दिसून येत आहे.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
Mehkar Assembly constituency shinde shiv sena thackeray shiv sena Siddharth Kharat Sanjay Raimulkar buldhana district
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Panvel issue of commuters loot of passengers Panvel,
पनवेल : प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच

गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक स्वरूपात दहीहंडी साजरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. मंडळांसह काही राजकीय नेते आपल्या परिसरात मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी करतात. शहरातील दापोडी, निगडी, प्राधिकरण, इंद्रायणीनगर, भोसरी या मानाच्या चौकांमध्ये मोठ्या दहीहंडी फुटतात. गतवर्षी महापालिका निवडणूक होण्याची शक्यता होती. त्यामुळे दहीहंडीच्या माध्यमातून निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी शहरभर फलकबाजी केली होती. सिनेतारकांची उपस्थिती, दहीहंडी पथकांवर देण्यात येणारी लाखो रुपयांची बक्षिसे, रोषणाईवर लाखोंचा खर्च करण्यात आला होता. मात्र महापालिका निवडणूक झाली नाही.

आणखी वाचा-देहूरोडमध्ये श्वानांचा छळ; दोघांविरोधात गुन्हा

निवडणूक कधी होईल याबाबत ठोसपणे काही सांगता येत नाही. तूर्तास निवडणूक होण्याची शक्यता धूसर दिसत आहे. त्यामुळे यंदा दहीहंडीच्या आयोजनात मोठी घट झाल्याचे दिसून येते. काही ठरावीक भागातच दहीहंडी उत्सवाची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांपासून खर्चच सुरू असल्याने माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी थाटलेली जनसंपर्क कार्यालयेदेखील बंद केली आहेत.

शहरातील ठरावीक भागात दहीहंडीची तयारी

यंदा पिंपरी, चिंचवड, मोशी भागातच दहीहंडीची तयारी सुरू आहे. गोविंदा पथकांचा उत्साह, बघ्यांची गर्दी, दहीहंडी फोडण्याची पथकांमधील वाढणारी चुरस, गाण्यांच्या स्वरात थिरकणारे सिनेतारका, तरुण असे वातावरण या वर्षी काही प्रमाणात कमी दिसणार आहे.

महापालिका निवडणूक कधी होईल हे सांगता येत नाही. दोन वर्षांपासून खर्चच सुरू आहे. त्यामुळे यंदा अनेकांनी खर्चात हात आखडता घेतला. सार्वजनिकरीत्या दहीहंडी उत्सव साजरा करण्याकडे पाठ फिरविली आहे. -अमित गावडे, माजी नगरसेवक, निगडी प्राधिकरण