पुणे : ‘जायंट आफ्रिकन स्नेल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अचॅटिना फुलिका या गोगलगाईच्या चिकट स्रावापासून (म्यूकस) तांबे आणि कोबाल्ट ऑक्साईड जैव-सूक्ष्म मिश्रणाचे (बायो-नॅनोकॉम्पोझिट) श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी संश्लेषण केले. त्याद्वारे प्रथमच प्रतिजैविक आणि कर्करोगावर औषध या गुणधर्मांसह डासांची अळीनाशक म्हणून काम करणारी जैव-सूक्ष्म मिश्रण प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग आणि संशोधन केंद्राचे प्रमुख, उपप्राचार्य डॉ. रवींद्र चौधरी, डॉ. प्रमोद माने, डॉ. दीपाली कदम, अशोक खडसे, आदित्य चौधरी, सुप्रिया उघडे, सचिन अगावणे यांचा संशोधनात सहभाग होता. तसेच या संशोधनासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील फिजिकल अँड मटेरिअल्स केमिस्ट्री डिव्हिजन, बायोकेमिकल सायन्सेस डिव्हिजन, ॲकॅडमी ऑफ सायंटिफिक अँड इनोव्हेटिव्ह रीसर्च या संस्थांनी सहकार्य केले. या संशोधनाचा शोधनिबंध स्प्रींजर-नेचर-बायोमेड सेंट्रलच्या ‘कॅन्सर नॅनोटेक्नॉलॉजी’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला.
संशोधनाबाबत डॉ. चौधरी म्हणाले, की अचॅटिना फुलिका या गोगलगाईच्या श्लेष्माचा, म्हणजे चिकट स्रावाचा जैव-सूक्ष्म मिश्रण संश्लेषणासाठी वापर करण्यात आला. ही गोगलगाय चालताना या स्रावाचा वंगण म्हणून उपयोग करते. या चिकट स्रावात अल्प प्रमाणात प्रथिने असतात. तसेच या स्रावातील जैविक घटक जैव-सूक्ष्म मिश्रण संश्लेषण, जैव-रासायनिक संयुगाच्या संश्लेषणात मदत करतात आणि त्यावरील आवरण म्हणून काम करतात. ही जैव-सूक्ष्म मिश्रण प्रणाली पर्यावरणपूरक आहे. त्याने मानवी पेशी, वनस्पतींची हानी होत नाही.
हेही वाचा >>>लोकसभेत पुण्यात मतदानाचा टक्का वाढणार?
सध्याच्या जैव-सूक्ष्म मिश्रणामध्ये स्टॅफिलोकोकस ऑरियस, स्यूडोमोनास एरोजिनोसा या प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या (अँटिबायोटिक रेझिस्टंट), मानवात विविध रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूंविरुद्ध अतिशय परिणामकारक असे जिवाणू प्रतिबंधक गुणधर्म दिसून आले. त्यामुळे या जैव-सूक्ष्म मिश्रणाचा वापर प्रतिजैविक प्रतिरोधकतेच्या जागतिक समस्येवर एक आश्वासक उपाय म्हणून केला जाऊ शकतो, असे डॉ. प्रमोद माने यांनी सांगितले.
तर जैव-सूक्ष्म मिश्रणाने मानवी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, तसेच आतड्याच्या कर्करोगाच्या पेशींविरुद्ध अत्यंत आश्वासक असे गुणधर्म दाखवले आहेत, असे डॉ. दीपाली कदम, आदित्य चौधरी यांनी सांगितले. मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका विषाणू या आणि अशा इतर रोगांची संख्या वाढवणाऱ्या डासांच्या अळ्यांचा नायनाट करण्याची क्षमता या जैव-सूक्ष्म मिश्रण प्रणालीमध्ये आहे, असे अशोक खडसे यांनी सांगितले.
प्राचीन काळापासून वनस्पती आणि प्राणी या दोन्हींचा समावेश असलेल्या जैविक साधनांचा औषध म्हणून वापर केला जातो. विविध प्रकारचे प्राणी, त्यांच्या विविध प्रजातींपासून मिळणारे अनेक घटक हे पारंपरिक औषधांचे प्रमुख घटक म्हणून वापरले गेले आहेत. त्यामुळे मानवी आरोग्य सेवा प्रणालीमध्ये औषधी उपचारांसाठी प्राणी संसाधनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आधुनिक युगात जैवविविधतेच्या निरंतर वापरातून जैवतंत्रज्ञान, जैविक साधनांची सांगड घालणे हे शाश्वत विकासाचे उत्तम उदाहरण आहे.- डॉ. रवींद्र चौधरी