लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला माहिती दिल्याप्रकरणी अटकेत असलेला डीआरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकरकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाइल संचाबाबत राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दिलेल्या माहितीत विसंगती आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून बुधवारी न्यायालयात करण्यात आला. कुरुलकर याच्या आवाज चाचणीवर (व्हॉइस लेअर सायकोलॉजिकल ॲनालिसिस टेस्ट) आणि जामीन अर्जावर १८ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
1 thousand 201 complaints received on C Vigil App within a month for violation of code of conduct
आचारसंहिता भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ; सी-व्हिजील ॲपवर महिन्याभरात १ हजार २०१ तक्रारी प्राप्त
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!
CCTV camera installed in 60 prisons due to inmate attacks and illegal provisions
सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’बंदच; अंमली पदार्थ, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण येणार तरी कसे?
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?

कुरुलकरच्या आवाजाच्या चाचणीस परवानगी मिळावी, असा अर्ज एटीएसकडून विशेष न्यायालयात नुकताच दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कुरुलकरच्या मोबाइल विदाचे (डेटा) विश्लेषण करायचे आहे. एक मोबाइल संच गुजरातमधील विशेष न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तांत्रिक विश्लेषणासाठी पाठविण्यात येणार आहे. कुरुलकरकडे आणखी एक मोबाइल संच असून, त्या मोबाइल संचाची दुरुस्ती करावी लागणार आहे. कुरुलकर तपासात सहकार्य करत नसल्याचे सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी न्यायालयात सांगितले होते. ‘एटीएस’ने दाखल केलेल्या अर्जावर बचाव पक्षाचे वकील ॲड. हृषीकेश गानू यांनी बुधवारी (९ ऑगस्ट) युक्तिवाद केला.

आणखी वाचा-पुणे: प्रवाशांसाठी खूषखबर! मेट्रो स्थानकातून थेट घरापर्यंत आता रिक्षा

कुरुलकरकडून जप्त केलेल्या मोबाइलबाबत दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) न्यायालयात देण्यात आलेल्या माहितीत विसंगती आहे. त्यामुळे जप्त करण्यात आलेला मोबाइल संच हा कुरुलकर याचा आहे की नाही, याची ओळख पटविणे आवश्यक आहे, असे बचाव पक्षाचे वकील ॲड. गानू यांनी युक्तिवादात नमूद केले.

या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल झालेले आहे. तपास अधिकाऱ्यांनी यापूर्वीच कुरुलकरचा मोबाइल संच जप्त करून पंचनामा केला आहे. कुरुलकरच्या मोबाइलमधील विदा मिळवला आहे, असे एटीएसने स्पष्ट केले आहे. त्याचा उल्लेखही दोषारोपपत्रात आहे. मात्र, सरकारी वकिलांनी पुन्हा न्यायालयात अर्ज केला आहे. कुरुलकरच्या मोबाइल विदाचे विश्लेषण करण्यासाठी गुजरातमधील विशेष न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवायचा आहे, असे अर्जात म्हटले आहे. एटीएसने दिलेल्या माहितीत विसंगती आहे, असे ॲड. गानू यांनी युक्तिवादात सांगितले.

आणखी वाचा-सरकारी घोळात घोळ! पुण्याला नवा आरटीओ मिळेना

कुरुलकरने ॲड. गानू यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश एस. व्ही. कचरे न्यायालयात सुनावणी सुरू असून, पुढील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी होणार आहे.