पुणे : पुण्यात मागील दोन दिवसांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे धारकाऱ्यांसोबत संवाद साधताना म्हणाले होते की, आपल्याला १५ ऑगस्ट रोजी जे स्वातंत्र्य मिळाले ते दळभद्र आणि हांडग स्वातंत्र्य आहे. आपल्याला ते जमत नसून स्वतंत्र हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे. तसेच वट सावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनीदेखील जाऊ नये,असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तर, काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी कसबा पेठेतील फडके हौद चौकात आंदोलन करीत संभाजी भिडे यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – येरवड्यातील बालसुधारगृहात राडा; डोक्यात फरशी घातल्याने अल्पवयीन मुलगा जखमी

हेही वाचा – पुणे : थकीत पैसे मागितल्याने अंगावर पाळीव श्वान सोडले; श्वानाच्या हल्ल्यात महिला जखमी

या सर्व घडामोडींदरम्यान पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रभात रोडवर मस्त ग्रुप आणि त्रस्त ग्रुपकडून अस्सल पुणेरी पाट्याप्रमाणे बॅनरच्या माध्यमातून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या महिलांबाबतच्या विधानाबाबत चांगलाच समाचार घेतल्याचे पाहण्यास मिळत आहे. दोन्ही बॅनरमध्ये असा मजकूर लिहिण्यात आला आहे की, महिलांनो असे कपडे घाला की, कोणी वाईट नजरेने बघता कामा नये. सौजन्य : मस्त ग्रुप, तर त्याच्याच खाली त्रस्त ग्रुपकडून पुरुषांनो! मन इतकं निखळ ठेवा की, कुणी कसेही कपडे घातले तरी नजर घसरता कामा नये! हा मजकूर असलेल्या बॅनरची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगल्याचे पाहण्यास मिळत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discussion of banner of mast group and trast group in pune svk 88 ssb