पुणे : हडपसर भागातील मगरपट्टा सिटीत घरकाम करणाऱ्या महिलेवर चोरीचा आळ घेतल्यानंतर तिला चौकशीसाठी पोलीस चौकीत बोलावून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने पोलिसांना पिण्यास पाणी मागितले. तेव्हा तिला लघुशंका प्यायला सांगण्यात आले, असा आरोप महिलेने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिलेने तक्रार दिल्यानंतर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणात दोषी आढळून आलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा – पिंपरी पोलिसातील हवालदाराचे होत आहे कौतुक, शरीर सौष्ठव स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक

तक्रारदार महिला मगरपट्टा सिटीत एका कुटुंबात घरकाम करते. संबंधित कुटुंबाच्या घरातून ऐवज चोरीला गेल्यानंतर त्यांनी मगरपट्टा पोलीस चौकीत तक्रार दिली. घरकाम करणाऱ्या महिलेने चोरी केल्याचा संशय त्यांनी तक्रारीत व्यक्त केला. त्यानंतर मगरपट्टा पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी मुंढवा येथे वास्तव्यास असलेल्या महिलेला पोलीस चौकीत चाैकशीसाठी नेले. पोलीस चैाकीत तिला बेदम मारहाण करण्यात आली. महिलेला साडेचार तास डांबून ठेवण्यात आले. महिला घरी न आल्याने तिचे कुटुंबीय विचारपूस करण्यासाठी मगरपट्टा पोलीस चौकीत गेले. तेव्हा पोलिसांनी नातेवाईकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मारहाण करणाऱ्या पोलिसांना चौकीत पाणी मागितले. तेव्हा त्यांनी लघुशंका पिण्यास सांगितले, असा आरोप महिलेने केला.

मारहाणीमुळे महिलेला चालता येत नव्हते. तिने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. युवा सेनेचे शहरप्रमुख सनी गवते. शुभम दुगाने, बाबासाहेब काेरे, प्रसाद खुडे, मोहन भालेराव यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना निवेदन दिले. महिलेला बेदम मारहाण करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कारवाईची मागणी त्यांनी केली. सहपोलीस आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. महिलेला पोलीस चौकीत बेदम मारहाण करण्यात आल्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यामात प्रसारित झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा – पुणे : कर्नाटकातील चडचंण टोळीच्या म्होरक्यासह साथीदारांना पकडले; तीन पिस्तुल, २५ काडतुसे जप्त

याप्रकरणाची चौकशी करण्यात आली. प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या दाेन महिला पोलीस कर्मचाऱ्यासह एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. – आर. राजा, पोलीस उपायुक्त, परिमंडळ पाच

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disgusting behavior by the police in pune a woman was brutally beaten at the police post pune print news rbk 25 ssb