लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: विधानसभेचे नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पुणे दौऱ्यात काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा पुढे आली. काँग्रेस भवन येथील नियोजित कार्यक्रमाआधी वडेट्टीवर कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना भेटल्याने शहराध्यक्ष अरविंद शिंदे नाराज झाले. त्यामुळे वडेट्टीवार यांच्या गाडीतून उतरून अरविंद शिंदे तडक काँग्रेस भवनात दाखल झाले. या प्रकारामुळे काँग्रेसमधील नाराजीनाट्य पुन्हा पुढे आले असून राज शिष्टाचारानुसार वडेट्टीवार यांनी काँग्रेस भवनाला प्रथम भेट का दिली नाही, असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती झाल्यानंतर विजय वडेट्टीवार यांचा रविवारी काँग्रेस भवन येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे वडेट्टीवार आधी काँग्रेस भवनाला भेट देतील, अशी शक्यता होती. मात्र, त्यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास प्राधान्य दिल्याने नाराजीनाट्य रंगले.
आणखी वाचा-पिंपरी- चिंचवडमध्ये १० ते १५ वाहनांची तोडफाड; सांगवी पोलिसांनी काढली आरोपींची धिंड!
काँग्रेस भवनाकडे जाण्याऐवजी वडेट्टीवार यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट देण्याचे जाहीर केले. त्यामुळे वडेट्टीवार यांच्या समवेत असलेले अरविंद शिंदे नाराज झाले आणि ते गाडीतून उतरून थेट काँग्रेस भवनात दाखल झाले. वडेट्टीवावर काँग्रेस भवन येथे येणार असल्याने अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी काँग्रेस भवनात उपस्थित होते. हा प्रकार समजल्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. काँग्रेस भवनतर्फे वडेट्टीवार यांचा सत्कार होणार होता. त्यामुळे त्यांनी प्रथम काँग्रेस भवनाला भेट देणे अपेक्षित होते, असा दावा काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.
आणखी वाचा-पुणे: कव्वालीचा कार्यक्रम बंद केल्याने उपाहारगृहात तोडफोड; टोळक्याविरुद्ध गुन्हा
गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी सातत्याने उघडकीस येत आहे. काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून शहराध्यक्ष आणि आमदार यांचे स्वतंत्र गट तयार झाले आहेत. त्यामुळे एकमेकांच्या बैठकांना पाठ फिरविण्याचे प्रकारही घडत असल्याचे दिसून आले आहे.
राज्यात सध्या तोडफोडीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास उडत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट सत्तेत सहभागी झाला आहे. मात्र, लांडग्यांच्या कळपात गेलेल्यांना लांडगे सोडणार नाहीत. अजित पवार यांचा वापर भाजप टेकू म्हणून करत आहे. भाजपची स्वबळावर जिंकण्याची ताकद नाही. तोडफोडीच्या राजकारणाने भाजपने लोकांचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे त्यांना या प्रकाराची गरज पडत आहे. -विजय वडेट्टीवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते