लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेतील चुकीच्या कामांचे लेखापरीक्षण करणार असल्याची घोषणा केल्याने अगोदरच नाराज असलेल्या शहर भाजपमध्ये नव्या कार्यकारिणीवरून नाराजीची भर पडली आहे. धुसफूस सुरू झाली असून, माजी शहराध्यक्ष, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या जवळच्या समर्थकांना मानाचे स्थान दिले नाही. शंकर जगताप यांच्या नियुक्तीला विरोध करणारे अमोल थोरात यांनाही कार्यकारिणीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे भाजपमध्ये आलबेल असल्याचे दिसत नाही.

Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
ajit pawar group on suresh dhas
Suraj Chavan: “..तेव्हा गृहखातं झोपा काढत होतं काय?”, सुरेश धसांच्या विधानानंतर अजित पवार गटाच्या नेत्याची टीका
Nitin Gadkari statement on air pollution Nagpur news
नितीन गडकरी म्हणतात… ४० टक्के वायू प्रदुषणाला आमचेच मंत्रालय जबाबदार

आगामी काळातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष जगताप यांनी कार्यकारिणी जाहीर केली. परंतु, या कार्यकारिणीवरून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. माजी शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या कार्यकारिणीतील अनेकांना वगळल्याचे दिसते. पूर्वीच्या कार्यकारिणीत गटा-तटाचा समतोल होता. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी समर्थकांना कार्यकारिणीत घेण्यास भाग पाडले होते. यंदा मात्र आमदार लांडगे गटाकडून हालचाली झाल्या नाहीत. जवळच्या समर्थकांची नावे दिली गेली नाहीत. भोसरीतील दोघांची नावे सरचिटणीसपदासाठी दिली खरी पण ते जवळचे समर्थक नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या सुजाता पालांडे यांना महिला शहराध्यक्षपदाची तर, माजी उपमहापौर असलेल्या तुषार हिंगे यांना युवा मोर्चाचे अध्यक्ष केले. पण, हिंगे हे वयाच्या नियमात बसत नसल्याचे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सवात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

सरचिटणीसपदी पिंपरीतील संजय मंगोडेकर, चिंचवडमधील शीतल शिंदे, नामदेव ढाके आणि भोसरीतील विलास मडिगेरी, शैला मोळक, अजय पाताडे यांना संधी दिली आहे. कार्यकारिणीवर आमदार उमा खापरे यांचे वर्चस्व दिसते. मागीलवेळी १२८ पैकी भाजपचे ७७ नगरसेवक होते. यंदा शंभर नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केला होता. त्यातच अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत आल्याने शहरात नाराजीचा सूर आहे. जागा वाटप कसे होणार याचा पेच आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगताप, आमदार लांडगे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत. त्यामुळे त्यांना पवार यांच्या कार्यशैलीची माहिती आहे. पवार यांनी महापालिकेतील कामकाजात लक्ष घातले. भाजपच्या काळातील कामांचे लेखापरीक्षण करण्याचा इशारा दिला. मात्र, याची भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून कोणी दखल घेत नसल्याने शहरातील भाजप नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोणाच्या सांगण्यावरून कोणाला संधी दिली नाही. सर्वसमावेशक कार्यकारिणी आहे. कोणतीही नाराजी नाही. -शंकर जगताप, शहराध्यक्ष

Story img Loader