पिंपरी : शहरात राजकीय अस्तित्वासाठी झगडत असलेल्या काँग्रेसमधील गटबाजी आणि नाराजी चव्हाट्यावर आली आहे. शहरात ‘एक व्यक्ती, एक पद’ हा नियम का लागू केला जात नाही, असा सवाल करत जुन्या पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांना पत्र पाठवून शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या दोन पदांबाबत आक्षेप घेतला आहे. कदम यांना महाराष्ट्र प्रदेश समितीच्या नेत्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे.
कदम यांच्याकडे काँग्रेस शहराध्यक्ष पदाबरोबरच इंटकचे प्रदेशाध्यक्षपद आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात एक व्यक्ती एक पद असा ठराव होऊनही शहराध्यक्षांच्या बाबतीत या निर्णयाची अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल पत्रातून केला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविलेल्या पत्रावर शहरातील वरिष्ठ उपाध्यक्षांसह माजी नगरसेवकांची स्वाक्षरी आहे. तत्कालीन शहराध्यक्ष सचिन साठे यांनी राजीनामा दिल्यानंतर कदम यांची २०२१ मध्ये शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. साठे यांनी पक्षांतर केले. आता कदम यांच्या नियुक्तीलाच आक्षेप घेण्यात आला असून, पक्षातील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे.
हेही वाचा… “ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांना अटक करा”, आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी
एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचा बालेकिल्ला होता. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर शहरात काँग्रेसला उतरती कळा लागली. राज्यात सत्ता असताना शहरातील पदाधिकाऱ्यांना ताकत मिळाली नाही. त्यामुळे अनेकांनी हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणे पसंत केले. सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने ६६ उमेदवार उभे केले होते. मात्र काँग्रेसला भोपळा मिळाला. काँग्रेसचा एकही नगरसेवक मागील सभागृहात नव्हता. शहर काँग्रेसमुक्त झाले होते. मावळ लोकसभेसह विधानसभेला तीनही मतदारसंघांत काँग्रेसचा उमेदवार नव्हता. त्यामुळे पक्षापासून कार्यकर्ते दुरावल्याचे दिसून येते. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तरी प्रदेश पातळीवरील नेते लक्ष घालणार का, असा प्रश्न काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
हेही वाचा… पुणे जिल्ह्यातील मतदार संख्या ८० लाख ७३ हजार
कदम यांच्याकडे इंटकचे प्रदेशाध्यक्षपद हंगामी स्वरूपाचे आहे. इंटक ही पक्षाची उपविभाग शाखा आहे. त्यामुळे दोन पदांचा नियम त्यांना लागू होत नाही. – नरेंद्र बनसोडे, वरिष्ठ उपाध्यक्ष, काँग्रेस