पुणे : क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना कात्रजमधील संतोषनगर भागात बुधवारी सायंकाळी घडली. गोळीबारात कोणी जखमी झाले नाही. मात्र, त्यानंतर दोन गटांत झालेल्या हाणामारीमध्ये दोन तरुणांवर शस्त्राने वार करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संतोषनगर भागातील घुंगुरवाला चाळ परिसरात तरुण बुधवारी सायंकाळी क्रिकेट खेळत होती. त्या वेळी तरुणांच्या दोन गटांत वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्या वेळी एकाने पिस्तुलातून गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. दोन तरुणांवर शस्त्राने वार करण्यात आले.

हेही वाचा…पिंपरी : विनापरवाना रस्ते खोदताय; पोलिसांनी दिला ‘हा’ इशारा

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, तो सराइत असल्याची माहिती देण्यात आली. गोळीबार झाल्यानंतर परिसरात घबराट उडाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute in two groups while playing cricket shooting and stabbing in pune s katraj area pune print news rbk 25 psg