लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : उपाहारगृहातील बिलावरुन वाद झाल्याने कामगारांनी ग्राहकांना बेदम मारहाण केल्याची घटना वारजे भागात घडली. याप्रकरणी हॉटेल मालक, व्यवस्थापकासह कामगारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आणखी वाचा-राखी पौर्णिमेला पोलिसांची अनोखी भेट; दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांना पकडले

याप्रकरणी वेदांती हॉटेलचे मालक शंकर अण्णा, व्यवस्थापकासह चार ते पाच कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत राधेशाम रामराव एकशिंगे (वय २३, रा. जिजाऊ होम्स, वारजे ) याने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वारजे भागातील वेदांती हॉटेलमध्ये राधेशाम, त्याचे मित्र रघुनाथ डफडे, सुनील पवार जेवायला गेले होते. त्या वेळी बिलावरुन त्यांच्यात वाद झाला. हॉटेल मालक, व्यवस्थापक, तसेच कामगारांनी बेदम मारहाण केल्याचे राधेशाम याने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस नाईक वणवे तपास करत आहेत.
दोन दिवसांपूर्वी डॉक्टर मैत्रिणीसोबत कोंढव्यातील एका उपाहारगृहात जेवायला गेलेल्या व्यावसायिकाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute over the bill in the restaurant workers beat up the customers pune print news rbk 25 mrj