वाकड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक महिला अधिकाऱ्यांशी टेम्पो चालकाने हुज्जत घातल्याप्रकरणी वाकड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मध्यरात्री पिंपरी-चिंचवडच्या डांगे चौकात घडली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता जिजाभाऊ गोडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाहन चालकावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल फुलचंद थोडसरे (वय-२६, रा.चिंचवड गाव, मूळ-खामसवाडी, जि. उस्मानाबाद) असं हुज्जत घालणाऱ्या टेम्पो चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बुधवारी मध्यरात्री महिला पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांचे कर्मचारी हे रात्रीची गस्त घालत होते. त्यावेळी डांगे चौकात टेम्पो उभा असल्याचे दिसले,चालकाला टेम्पो बाजूला घेण्यास सांगितला मात्र त्याने टेम्पो बाजूला न घेता महिला पोलीस उपनिरीक्षाकाशी हुज्जत घातली आणि शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी त्याला ताब्यात घेतलं असून महिला पोलीस अधिकाऱ्याने वाकड पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांशी हुज्जत घालणे,पोलिसांवर हात उचलणे या घटनेत वाढ झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute with woman police officer in pimpri chinchwad case registered
Show comments