पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागातील पाणीपुरवठा शुक्रवारी (११ नोव्हेंबर) दिवसभर विस्कळीत झाला. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- मालमत्ता कर थकबाकीदारांच्या घरातील वस्तू जप्तीचे आदेश; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निर्णयाला लोकप्रतिनिधींकडून विरोध

मुख्य जलवाहिनीला उपवाहिन्या जोडणीचे काम शुक्रवारी सकाळी सुरू करण्यात आले. त्यामुळे पालिकेच्या क, इ आणि फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, मोशी, डुडूळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी, पांजरपोळ, सेक्टर १२, इंद्रायणीनगर आदी भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.

हेही वाचा- मुळा-मुठा नदीकाठ पुनरुज्जीवन योजना ‘गाळात’; पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेची संयुक्त निविदा रद्द

यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख श्रीकांत सवणे म्हणाले की, शनिवारी सकाळचा पाणीपुरवठा उशिरा आणि कमी दाबाने येईल. नागरिकांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे. शहराच्या लोकसंख्या वाढीचा दर आणि भविष्यातील लोकसंख्या विचारात घेता नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.