पिंपरी : महापालिकेच्या रावेत पंपिंग स्टेशन येथील टप्पा क्रमांक तीन, चारची उर्ध्व नलिका (रायझिंग मेनला) गळती लागल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. बुधवारी सायंकाळचा पाणीपुरवठा झाला नाही. उद्याचाही (गुरुवार) पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.

शहरवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पवना नदीतील रावेत बंधारा येथून महापालिका पाणी उचलते. उर्ध्व नलिकेला गळती लागल्यामुळे टप्पा क्रमांक तीन, चारवरील चिंचवडचा काही भाग, नेहरुनगर, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळेगुरव, सांगवी, वाकड, निगडी प्राधिकरण, ताथवडे, किवळे, मामुर्डी, चिखली, मोशीचा काही भाग, जाधववाडी, रुपीनगर, तळवडे, कृष्णानगर, यमुनानगर, आकुर्डी या भागातील पाणीपुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी बुधवारी बंद ठेवला होता. त्यामुळे सायंकाळी पाणीपुरवठा झाला नाही. उद्या गुरुवारीही पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होईल. दुरुस्ती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. रात्री बारापर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

fake graduation certificate pune municipal corporation
पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास

हेही वाचा – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी दोन तासांचा वाहतूक ब्लॉक

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कामगिरी; मूळ मालकांना दिला दोन कोटींचा मुद्देमाल परत

महापालिका तळमजल्यावरच पाणी देणार

गृहनिर्माण संस्थांमधील तळमजल्यावरील साठवण टाकीमध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे महापालिकेचे कर्तव्य आहे. पहिल्या मजल्यावर, स्वयंपाकघरात महापालिका पाणी देऊ शकत नाही. टाकीवर इलेक्ट्रिकल मोटर, पंप लावून इमारतीवरील साठवण टाकीवर पाणी नेणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे साठवण टाक्यांची व्यवस्था नाही. त्यांनी इमारतीच्या तळमजल्यावर, गच्चीवर साठवण टाकी बांधण्याचे आवाहन करत इमारतीच्या कोणत्याही मजल्यावर पाणीपुरवठा केला जाणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.