पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघापैकी एक काँग्रेसला सोडण्याची आग्रही मागणी स्थानिक नेत्यांनी एकमुखाने केली असली तरी नेमका कोणता मतदारसंघ हवा, याविषयी त्यांच्यात मतभेद असल्याचे चित्र पुढे आले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे होता, तेथे यापूर्वीचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी निवडणूक लढवली होती. तथापि, ते पराभूत झाले. तरीही मतदारसंघावर काँग्रेसने दावा कायम ठेवला होता. भोईर यांच्यासह बाबासाहेब तापकीर, सचिन साठे, विनोद नढे अशी अनेकांची नावे चर्चेत होती. तथापि, काँग्रेसच्या उमेदवारीत स्वारस्य नसलेल्या भोईरांनी शिवसेनेशी ‘गुफ्तगू’ सुरू केली व अन्य इच्छुक प्रबळतेने पुढे आले नाहीत. त्यामुळे चिंचवड मतदारसंघाचे गणित डळमळू लागले व िपपरी मतदारसंघासाठी जोर वाढू लागला. चिंचवडला ‘पोलिंग एजंट’ मिळत नसताना तो मतदारसंघ कशासाठी, असा मुद्दा काँग्रेस कार्यकर्त्यांनीच मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांसमोर उपस्थित केला. त्यातच, माजी महापौर हनुमंत भोसले यांचे नाव पुढे करून भोसरी मतदारसंघाची मागणीही पुढे रेटली जाऊ लागली. नेमका कोणता मतदारसंघ हवा, याविषयी स्थानिक नेत्यांचे मतभेद दिसू लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ लागली आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीकडून घेतला जात आहे. अजितदादांनी तीनही मतदारसंघावर केलेला दावा त्याचाच एक भाग असल्याची भावना पक्षवर्तुळात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा