राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्ताने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोथरूड येथे विविध प्रकराच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. हवेली तहसील कार्यालयाच्या माध्यमातून कोथरूड येथे विविध दाखले जागेवर उपलब्ध करून देण्याची सुविधा करण्यात आली आहे. या सुविधेला शनिवारी प्रारंभ करण्यात आला.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात ५२ नागरिकांना उत्पन्नाचे दाखले, १८ रहिवास प्रमाणपत्र, २२ अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र, १२ प्रतिज्ञापत्र आणि २१ सातबारा असे १२५ दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

Story img Loader