प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा (पीएमजेएवाय) लाभ मिळण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील तीन लाख ३३ हजार नागरिकांना या योजनेचे ओळखपत्र वाटप करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>पुण्याला वाढीव पाणी मिळणार का?;पुणे महापालिकेची २० टीएमसी पाण्याची मागणी

Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
more than 1700 retirees people in nashik benefit from DLC scheme of Postal Department
सेवानिवृत्तवेतन धारकांच्या मदतीला टपाल विभाग, जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक जणांना डीएलसी योजनेचा लाभ
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता
Dombivli tax arrears people, Dombivli property seal,
डोंबिवलीत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या गाळ्यांना टाळे
What is the National Health Claim Exchange health insurance
आरोग्य विम्याची प्रक्रिया आता जलद? काय आहे ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’?
Scrutiny of all applications of beneficiaries of the Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana  Mumbai news
लाखो बहिणी नावडत्या; ‘लाडकी बहीण’ योजनेच्या सर्व अर्जांची छाननी,वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आदिती तटकरेंची घोषणा
insurance, Dharavi, 10 crore medical insurance Dharavi,
धारावीतील ३०० हून अधिक रहिवाशांना १० कोटी रुपयांचा वैद्यकीय विमा

आयुष्मान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू करण्यात आली. आयुष्मान भारत योजनेत केंद्र सरकारकडून गरजू कुटुंबांना आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यात येतो. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आयुष्यमान भारत योजना देशभरात चालवली जात आहे.
पुणे महानगरपालिका क्षेत्रात एक लाख १३ हजार २७३ ओळखपत्रांचे वाटप करण्यात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ४७ हजार ९५७, दौंड नगरपरिषद क्षेत्रात २४९९, बारामती नगरपरिषद क्षेत्रात २१७०, तळेगाव-दाभाडे ५३२०, जुन्नर १७४४, पुणे कटक मंडळात (कॅन्टोन्मेंट) १५३५, शिरूर नगरपरिषद क्षेत्रात २८२५, जेजुरी नगरपरिषद क्षेत्रात ११८३, सासवड ११७७, भोर ११५१, इंदापूर ९५१, देहू रोड कटक मंडळात ९०६ आणि आळंदी नगरपरिषद क्षेत्रात ८५० ओळखपत्रांचे वाटप प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अशाप्रकारे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह नगरपरिषद क्षेत्रांत दोन लाख ७२ हजार ६०७ कुटुंबांपैकी एक लाख ८३ हजार ५४१ कुटुंबांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत.

हेही वाचा >>>पुणे: तुम्हाला डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का? फोन करत ७९ वर्षीय व्यक्तीची तब्बल १७ लाखांची फसवणूक

दरम्यान, ग्रामीण भागात आंबेगाव तालुक्यात १३ हजार ६०६, बारामती तालुक्यात २० हजार ७२७, भोर ४४६३, दौंड १८ हजार १५२, इंदापूर १५ हजार ३१३, जुन्नर २० हजार ७७९, खेड ७६२६, मावळात ९४८३, मुळशीत २१०२, पुरंदर ७३३९, शिरूरमध्ये ९५९८ आणि वेल्हे तालुक्यात १९७३ असे एकूण एक लाख ७९ हजार ३९५ कुटुंबांपैकी एक लाख ५० हजार १२९ कुटुंबांना ओळखपत्र देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरासह जिल्ह्यात एकूण तीन लाख ३३ हजार ६७० ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

Story img Loader