लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ सन्मान योजनेतील लाभार्थ्यांना रक्कम वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम पुण्यात शनिवारी (दि. १७ ऑगस्ट) होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून महिला उपस्थित राहणार असून महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील रक्कम जमा करण्यात येणार आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे दुपारी साडेबारा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत.

आणखी वाचा-‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव डावलले

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबीकरण आणि त्यांना आत्मनिर्भर करण्याबरोबरच त्यांच्या सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार या कार्यक्रमात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील लाभ रक्कम पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. राज्यातील १५ हजारांहून अधिक लाभार्थी प्रातनिधिक स्वरूपात कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या लाभार्थ्यांना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य तपासणी आदी उपक्रमही राबविली जाणार असून महिलांना कार्यक्रमाच्या ठिकाणी नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिना १ हजार ५०० रुपयांची रक्कम जमा केली जाणार असून दोन महिन्यांची मिळून तीन हजार रुपये महिलांना मिळणार आहेत.

आणखी वाचा-मोदी सरकारकडून विधानसभा निवडणुकीआधी पुणेकरांना गिफ्ट! स्वारगेट ते कात्रज मेट्रोला हिरवा कंदील

दरम्यान, जिल्ह्यातील पाच लाखाहून अधिक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर या योजनेची रक्कम जमा झाली आहे. राज्यात १ कोटी ५६ लाख ६१ हजार २०९ महिलांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी सर्वाधिक नोंदणी ९ लाख ७४ हजार ६६ एवढी पुणे जिल्ह्यातील आहे.

तटकरे, डॉ. गोऱ्हे यांच्याकडून तयारीचा आढावा

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी तयारीचा आढावा घेतला. महिलांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. दरम्यान, या योजनेबाबत विरोधकांकडून गैरसमज पसरविले जात आहेत. कष्टकरी महिलांना भेट मिळत असल्याने समाजातील अन्य कोणत्याही वर्गामध्ये त्याबाबत नाराजी नाही, असे गोऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Story img Loader