पुणे : नागरिकत्वाचा पुरावा आणि महत्त्वाचा सरकारी दस्तावेज म्हणून ज्ञात असलेल्या पारपत्राची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून पुणे क्षेत्रीय पारपत्र कार्यालयाकडून २०२२ मध्ये तब्बल तीन लाख ४४ हजार ४४७ पारपत्रे देण्यात आली आहेत. ही संख्या २०२१ च्या तुलनेत तब्बल एक लाख १३ हजार १०१ ने अधिक आहे.

पुणे क्षेत्रीय पारपत्र कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. २०२१ मध्ये पुणे क्षेत्रीय कार्यालयाकडून दोन लाख ३१ हजार ३४६ पारपत्र देण्यात आले. यंदा त्यात एक लाख १३ हजार १०१ पारपत्रांची भर पडली आहे. २०२१ मध्ये ६७३५ पोलीस पडताळणी प्रमाणपत्रे (पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट) देण्यात आली. २०२२ मध्ये ही संख्या १२,८५६ वर जाऊन पोहोचली. पारपत्र काढण्यासाठी तातडीचे कारण नसल्यास नियमित अर्ज प्रक्रियेतून पारपत्रासाठी अर्ज करावा. कागदपत्रे पुरेशी आणि निर्दोष असल्यास पारपत्र मिळण्यास कोणत्याही अडचणी येत नाहीत, असे पारपत्र कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Important information regarding Group-B Non-Gazetted and Group-C cadre posts outside MPSC purview
स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती! गट ब (अराजपत्रित), गट क संवर्गातील पदे एमपीएससीच्या कक्षेत आणण्यासाठी एक पाऊल पुढे…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
more than 1700 retirees people in nashik benefit from DLC scheme of Postal Department
सेवानिवृत्तवेतन धारकांच्या मदतीला टपाल विभाग, जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक जणांना डीएलसी योजनेचा लाभ
Chief Minister Ladki Bahin Yojana received great response from Pimpri Chinchwad city
पिंपरीत सर्वाधिक लाडक्या बहिणीचे अर्ज बाद
Rohingya house in Pune
Rohingya in Pune: रोहिंग्याने बांधले थेट पुण्यात स्वतःचे घर, भारतीय पासपोर्टही मिळवले
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
mhada lottery 2024 konkan board extend application deadline for 2264 homes
म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२४ : २२६४ घरांच्या सोडतीला अखेर १५ दिवसांची मुदतवाढ, २५ डिसेंबरपर्यंत अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया
mhada launch special campaign for sale of 11176 houses on first come first serve from 2nd december
म्हाडाच्या विशेष मोहिमेला अखेर चांगला प्रतिसाद; ५५०० जणांकडून घरासाठी चौकशी, प्रत्यक्षात २५० जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज केले दाखल

हेही वाचा – पुणे : एक लाख रुग्णांचे वाचले प्राण! १०८ रुग्णवाहिका सेवेचा नागरिकांना लाभ

पुणे क्षेत्रीय पारपत्र कार्यालयाचे क्षेत्रीय पारपत्र अधिकारी डॉ. अर्जुन देवरे म्हणाले, करोना साथरोगाच्या काळात नागरिकांच्या प्रवास आणि पर्यटनावरही काहीसे निर्बंध होते. ते दूर झाल्यानंतर २०२२ मध्ये पारपत्रासाठी असलेल्या मागणीत वाढ झालेली पाहायला मिळाली. पारपत्राचे दस्तऐवज म्हणून असलेले महत्त्व ओळखून आपल्याकडे पारपत्र असावे या भावनेतून त्यासाठी अर्ज करणारे नागरिकही आहेत. अचूक आणि मूळ कागदपत्रे दिली असता पारपत्र मिळणे अजिबात अवघड नाही, त्यामुळेही पारपत्र काढण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण डॉ. देवरे यांनी नोंदवले.

पारपत्र काढणे खर्चिक नाही

पारपत्र काढणे ही प्रक्रिया अवघड आहे, या गैरसमजातून अनेक नागरिक पारपत्र काढण्यासाठी दलालांची मदत घेतात. माणशी शुल्क आकारून हे दलाल मोठी रक्कम आकारतात. मात्र, कागदपत्रांमध्ये त्रुटी नसल्यास पारपत्र काढणे ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यामुळे दलालांमार्फत अर्ज करून पैसे आणि वेळ वाया घालवणे अनावश्यक आहे, असे आवाहन डॉ. अर्जुन देवरे यांनी केले आहे.

हेही वाचा – पुणे जिल्ह्यात ७४ हजार नवीन मतदार, हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ११ हजार मतदार वाढले

पारपत्र कार्यालयाची व्याप्ती

पारपत्र काढण्यासाठी https://www.passportindia.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करणे शक्य आहे. पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्यालय बाणेर येथे आहे. मुंढवा आणि सोलापूर येथे पारपत्र सेवा केंद्र आहेत. कोल्हापूर, अहमदनगर, बारामती, बीड, इचलकरंजी, जालना, लातूर, माढा, नांदेड, उस्मानाबाद, पंढरपूर, परभणी, पिंपरी-चिंचवड, सांगली, सातारा, शिरुर, श्रीरामपूर येथील १७ टपाल कार्यालयांमध्ये पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्राची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Story img Loader