लोणावळ्यात पर्यटनानिमित्त येणाऱ्या पर्यटकांमुळे शहरात वाहतूक कोंडी होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी येत्या आठ दिवसांत शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी दिले. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा नगरपरिषद कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, मुळशी-मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, वडगाव मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा- डाॅ. राजा दीक्षित यांचा विश्वकोश निर्मिती मंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा

Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
soybean procurement deadline extension news in marathi
सोयाबीन खरेदीस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून मान्य
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Central government decision farming Relief
दहा वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा; जाणून घ्या, केंद्र सरकारने २०१४ नंतर पहिल्यांदाच कोणता निर्णय घेतला?
devendra fadanvis
३५०० एकर जमिनीचे १०० दिवसांत वितरण; ‘एमआयडीसी’च्या भूखंडांबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश

शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने तत्काळ कार्यवाही करावी. शहरातील वाहतूक समस्येबाबत व्यापारी संघटना, सामाजिक संस्था, रिक्षा संघटना आदींसोबत नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात. कुसगाव आणि वरसोली पथकर नाका या दोन्ही नाक्यांवर नागरिकांना पथकर भरावा (टोल) लागत असल्यामुळे याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. शहराची सर्व अर्थव्यवस्था पर्यटनावरच अवलंबून असल्यामुळे पर्यटकांना मूलभूत सुविधा पुरविण्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा- ‘संशोधनात आपण बरेच मागे आहोत’; राधाकृष्ण विखे पाटील यांनी विद्यापीठांना सुनावले खडे बोल

लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी लोणावळा परिक्षेत्रातील वाहतूक आणि वाहनतळ समस्या व त्यावरील उपाय योजनांची विस्तृत माहिती सादर केली. पुणे मुंबई या शहरांच्या मध्यवर्ती असे लोणावळा शहर असल्याने पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे अपोलो गॅरेज ते भारत पेट्रोलियम पंप वळवण या ठिकाणी वाहतूककोंडी होते. यासाठी पर्यायी मार्ग सुचविण्यात आले.

हेही वाचा – वीज अभियंत्याच्या हलगर्जीमुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; कात्रज-कोंढवा रस्त्यावरील घटनेत गुन्हा दाखल

या उपाययोजना प्रस्तावित

कुमार चौक ते भांगरवाडी रस्ता रुंदीकरण, शहरातील व मुंबई-पुणे महामार्गावरील रिक्षा स्थानकाचे नियोजन करणे, संबंधितांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे, वाहनांसाठी पुरेशी वाहनतळ व्यवस्था नगरपरिषदेने उपलब्ध करणे, सिग्नल यंत्रणा सुरू करणे, नवीन सिग्नल बसविणे, भटकी जनावरे, अनधिकृत फेरीवाले, भाजी विक्रेते यांचा बंदोबस्त करणे, भांगरवाडी व खंडाळा येथे उन्नत मार्ग उभारणे, लोणावळा शहरातील बस स्थानक शहराबाहेर स्थलांतरित करणे, व्यापारी वर्गाकरिता माल चढवणे-उतरविणे (लोडिंग-अनलोडिंग) वेळ निश्चित करणे आदी उपाययोजनांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

Story img Loader