लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: नाट्यछटाकार हीच खरं तर शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांची ओळख. त्यांनी लिहिलेली ‘रिकामी काडेपेटी’ ही नाट्यसंहिता आता पोलिश भाषेत रंगमंचावर सादर होणार आहे. मूळचे पुणेकर पण, अध्यापन कार्यासाठी पोलंड येथे वास्तव्यास असणारे मंदार पुरंदरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Marathi actress Mukta Barve special post after appearing in Indrayani serial
‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Kartik Aaryan
डिओड्रंटचा वापर करून ‘या’ अभिनेत्याने जाळले होते बहिणीचे केस; आईनेच केला खुलासा
last show of Vastra Haran in new set was held today in Thane
नव्या संचातील ‘वस्त्रहरण’चा शेवटचा प्रयोग आज ठाण्यात, नेत्यांनाही भुरळ
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…
Savlyachi Janu Savli
Video : “आयुष्यातला अंधार…”, सावली आणि सारंगचे लग्न होणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
colors marathi abeer gulal serial likely to off air
अवघ्या ६ महिन्यांत गाशा गुंडाळणार कलर्स मराठीची मालिका? मुख्य अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “शेवटचे काही…”

पोलंडमधील पोझनान शहरात असलेल्या आदाम मित्चकीएविच विद्यापीठातील पुरंदरे प्राध्यापक आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून ‘रिकामी काडेपेटी’ ही संहिता पोलिश भाषेत रूपांतरित झाली आहे. पोझनान शहरातील ‘दोम त्रामवायाजा’ सांस्कृतिक भवनात ७ मे आणि ८ मे रोजी या नाटकाचा प्रयोग होणार आहे. पोलंडमधील विद्यार्थी-कलाकार मराठीतून पोलिशमध्ये भाषांतरित झालेल्या या संहितेचा प्रयोग सादर करणार असून पुरंदरे यांनी या विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली आहे.

आणखी वाचा- पुण्यातील ए आर रेहमान यांचा शो पोलिसांनी थांबवला; मंचावर येऊन अधिकाऱ्यांनी सुनावले खडेबोल

पुरंदरे म्हणाले, आदाम मित्चकीएविच विद्यापीठातल्या विभागात मी भारतीय रंगमंच हा विषय शिकवतो. अध्यापनाचा भाग म्हणून काही मराठी नाट्यसंहितांची पोलिश भाषांतरे मी विद्यार्थ्यांना वाचून दाखवत त्यांच्याशी चर्चाही करतो. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दिवाकरांच्या ‘रिकामी काडेपेटी’ या संहितेचे मी केलेले पोलिश भाषांतर विद्यार्थ्यांना ऐकवले. ही संहिता वाचून दाखविण्याआधी विद्यार्थ्यांना संहितेशी निगडित संवाद किंवा पाठ लिहून आणण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी त्यावर अभ्यास करून संवाद आणि पाठ लिहून आणले. यातून मूळ संहितेच्या पोलिश भाषांतरात हे नवे संवाद/पाठ गुंफण्यात आले आणि त्यातून त्याचा प्रयोग करण्याचे ठरले. या प्रयोगामध्ये विद्यापीठातातील भारतविद्या (इंडोलॉजी), नाटक विभाग आणि इंग्लिश तसेच पोलिश भाषा विभागांतील विद्यार्थ्यांनी भूमिका केल्या असून सध्या प्रयोगाची रंगीत तालीम सुरू आहे.