पुणे : पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए एस वाघमारे यांनी १३जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. सीबीआयने तपासादरम्यान घर व कार्यालयातून ६ कोटी ६४ लाखांची रोकड जप्त केली आहे.त्यांच्या कार्यालयालयात १ सीलबंद आयफोन आढळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. तक्रादार व आरोपी यांमध्ये झालेले संभाषण रेकॉर्ड झाले आहे.
त्यामध्ये आरोपीने पैसे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहे. चौकशीसाठी रामोड सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी सरकारी वकील अभय अरीकर यांनी ५ दिवसांची सीबीआय कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने मान्य करत तीन दिवसांची कोठडी सुनावली. सीबीआयचे अतिरिक्त अधिक्षक आय बी पेंढारी यांनी त्याला न्यायालयात हजर केले.