लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: देशभरातील तंत्रशिक्षण संस्थांची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) देशभरातील विभागीय कार्यालये बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या विभागीय कार्यालयांचे रूपांतर ‘इंडोव्हेशन सेंटर’मध्ये (इंडियाज इनोव्हेशन) केले जाणार असून, या केंद्राच्या माध्यमातून अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये तंत्रज्ञान विकसन, तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यात येणार आहे.

Bigg Boss 18
अशनीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला सलमान खान; विचारले खरमरीत प्रश्न
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
yek number actor vishal sudarshanwar plays raj thackeray role
“तेव्हा समोर स्वत: राजसाहेब बसले होते…”, ‘येक नंबर’मध्ये मनसे अध्यक्षांची भूमिका कोणी साकारलीये? अभिनेता म्हणाला…
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Vistara Completes Merger With Air India
‘विस्तारा’ नाममुद्रा इतिहासजमा; एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण

नुकतेच पुणे दौऱ्यावर आलेले एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीतारामन यांनी ही माहिती दिली. एआयसीटीईची कानपूर, मुंबई, चंदीगढ, गुवाहाटी, कोलकाता, बंगळुरू, तिरुअनंतपुरम, हैद्राबाद, चैन्नई, भोपाळ, बडोदा येथे विभागीय कार्यालये आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत प्रशासकीय कामकाज करण्यात येत होते.

हेही वाचा… ड्रग्ज तस्करीसाठी ‘या’ कोड इमोजींची केला जातो वापर; पुणे पोलिसांनी पालकांना केले सतर्क, पाहा यादी

मात्र आता ही कार्यालये बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय एआयसीटीईने नुकताच घेतला. देशातील नवउद्यमी, उद्योजकता, नवसंशोधन, तंत्रज्ञान विकसनाला चालना देण्यासाठी विभागीय केंद्रांच्या जागेत इंडोव्हेशन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्या दृष्टीने सध्या मनुष्यबळ भरती करण्यात येत आहे. तसेच पायाभूत सुविधाही विकसित करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा… लोणावळ्याला जाताय? रेल्वेकडून ‘या’ लोकल तातडीने रद्द 

विद्यार्थी, प्राध्यापकांचे संशोधन, उद्योजकतेचा वाव देण्याचे काम इंडोव्हेशन केंद्रांच्या माध्यमातून करण्यात येईल. त्यासाठी केंद्रातील अधिकारी महाविद्यालयांमध्ये जाऊन नवउद्यमी, तंत्रज्ञानाशी संबंधित कल्पनांचा शोध घेतील, त्यांच्याशी हातमिळवणी करतील. व्यावसायिक उत्पादन ते निधी उभारणीपर्यंत त्यांना मदत, मार्गदर्शन केले जाईल, उद्योगांना जोडून दिले जाईल तसेच उद्योगांच्या गरजेनुसार तंत्रज्ञान हस्तांतरणासाठीही मदत करण्यात येईल. नोकरीकेंद्रित विद्यार्थी उद्योजकतेकडे वळणेही गरजेचे आहे, असेही प्रा. सीतारामन यांनी स्पष्ट केले.