नवरा-बायको घटस्फोट घेताना मुलांसाठी किंवा पोटगी मिळावी म्हणून भांडत असतात. अनेकदा घटस्फोटाची प्रकरणे ही त्या त्या कुटुंबासाठी खूप दुःखद अशी असतात. तर कधी कधी घटस्फोटाचे कारण इतके क्षुल्लक असते की, हसू आवरत नाही. पुण्यात घटस्फोटाचे एक वेगळे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पती-पत्नीने संमतीने घटस्फोट घेतला असला तरी एका पोपटामुळे काही काळ घटस्फोट रखडला होता. “राजाचा जीव पोपटात..”, अशी कथा तुम्ही ऐकली असेल. पण पोपटामुळे घटस्फोट रखडला, असे तुम्ही कधीच ऐकले नसले. पुण्यात आफ्रिकन पोपटामुळे एका दाम्पत्याचा घटस्फोट रखडला होता. पोपट दिल्यानंतरच पती-पत्नी विभक्त होऊ शकले.

हे वाचा >> पती-पत्नीची सहमती असेल तर आता लगेच घटस्फोट मिळेल; सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्त्वपूर्ण निकाल काय सांगतो?

Arvi Constituency, Amar Kale Wife Mayura Kale,
आर्वीत उमेदवार पत्नीसाठी पती, तर उमेदवार पतीसाठी पत्नी मैदानात
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
maharashtra vidhan sabha election 2024, chiplun sangameshwar assembly,
चिपळूण-संगमेश्वरमधील लढतीला निष्ठा विरुद्ध गद्दारी असे स्वरुप
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…

प्रकरण काय होते?

वकील भाग्यश्री सुभाष गुजर यांनी सदर प्रकरणात पतीची कायदेशीर बाजू हाताळली होती. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी या आगळ्या-वेगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “पतीने पत्नीला लग्नापूर्वी आफ्रिकन ग्रे जातीचा पोपट भेट दिला होता. लग्नानंतर काही वर्षांतच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. अनेक काळापासून दोघांचे पटत नव्हते. त्यामुळे त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.”

वकील भाग्यश्री पुढे म्हणाल्या, “११ डिसेंबर २०१९ रोजी पुण्यातील रजिस्ट्रार कार्यालयात दोघांनीही नोंदणी पद्धतीने लग्न केले होते. मात्र सप्टेंबर २०२१ रोजी लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्यांच्यात मतभेद होऊन खटके उडू लागले. अखेर पत्नीने विभक्त होण्यासाठी डिसेंबर २०२२ रोजी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. यानंतर हे प्रकरण समुपदेशनासाठी पाठिवण्यात आले, तेव्हा एक धक्कादायक बाब समोर आली.”

आणखी वाचा >> ‘मानसिक क्रूरते’मुळे शिखर धवनचा घटस्फोट मंजूर; क्रूरतेचे प्रकार काय आणि कायदा काय सांगतो?

अखेर घटस्फोट परत दिला

दोघंही एकमेकांसह यापुढे एकत्र राहण्यासाठी इच्छुक नसल्याचे लक्षात आल्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय झाला. पती आणि पत्नी त्यासाठी तयारही होते. पत्नीने पोटगीची मागणी न केल्यामुळे दोघांच्या संमतीने घटस्फोट होईल, असे वाटत असतानाच ‘लग्नापूर्वी आपण भेट दिलेला आफ्रिकन ग्रे पोपट परत करावा’, या मागणीवर पती अडून बसला. तर पत्नी पोपट द्यायला तयार नव्हती. पुन्हा समुपदेशन केल्यानंतर पत्नीने पोपट परत करण्याचे मान्य केले आणि त्यानंतर घटस्फोट मंजूर झाला, अशी माहिती भाग्यश्री गुजर यांनी दिली.