केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आरटीओतील एजंट हद्दपारीची ग्वाही दिली असताना आणि परिवहन आयुक्तांनी त्याबाबत नुकताच आदेश काढला असतानाही परिवहन मंत्री दिवाकर रावते हे मात्र याबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहेत. आरटीओ एजंटमुक्त कधी होणार, असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारल्यानंतर ‘‘एजंट म्हणजे काय? एजंटची व्याख्या व्यापक आहे,’’ असे विधान त्यांनी केले. ‘‘तुम्ही आरटीओमध्ये एखाद्या अधिकाऱ्याकडे जाऊन काम करून घेता, मग तुम्हालाही एजंट म्हणायचे का?’’ असा प्रतिप्रश्न करीत त्यांनी एजंट हद्दपारीच्या धोरणाची खिल्ली उडवली.
रावते यांनी रविवारी पुण्यात वाहतुकीशी संबंधित विविध संघटना व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही विधाने केली. आरटीओ कार्यालये सुसज्ज करण्याबरोबरच तेथील दलालांचा सुळसुळाट दूर करण्याची घोषणा गडकरी यांनी केली होती. तर परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी तीनच दिवसांपूर्वी सर्व आरटीओ कार्यालयांतून एजंट हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. या पाश्र्वभूमीवर रावते यांना प्रश्न विचारला गेला होता.
राज्यातील आरटीओमध्ये ६५० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. त्या त्या भागातील तरुणांना भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर एसटीला टोलमुक्ती देण्याचा निर्णय दोन महिन्यांत होईल. एसटीचे चालक व वाहन यांचा विमा उतरविण्याच्या योजनेचाही विचार करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
एजंट म्हणजे काय?
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आरटीओतील एजंट हद्दपारीची ग्वाही दिली असताना आणि परिवहन आयुक्तांनी त्याबाबत नुकताच आदेश काढला असतानाही परिवहन मंत्री दिवाकर रावते हे मात्र याबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहेत.
आणखी वाचा
First published on: 19-01-2015 at 01:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwakar rawate asks what is rto agent