निवडणुकीवेळी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आटापिटा करणाऱ्या नेते मंडळींनी आगामी निवडणुकीपूर्वी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवाळीची नामी संधी साधली आहे. वैयक्तिक भेटीगाठी, पणत्या, सुवासिक साबण-अत्तरे-उटणे आणि दिवाळी फराळाच्या जोडीला मतदारांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम, सहली, आरोग्य शिबिरे, गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ आणि खास भेटवस्तूंची रेचलेच असा सरंजाम सध्या मतदार अनुभवत आहेत. मतदारांना आकर्षित दिवाळीचा मुहूर्तही साधण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा >>>पुणे : पावसामुळे वाहनांमध्ये बिघाड, दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये गर्दी

Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक भेटीगाठी, पणत्या, सुवासिक साबण-अत्तरे-उटणे आणि दिवाळी फराळाच्या जोडीला मतदारांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम, सहली, आरोग्य शिबिरे, गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण समामंरभ आणि खास भेटवस्तूंची रेचलेच असा सरंजाम माजी नगरसेवक आणि राजकीय पक्षांकडून सुरू झाला आहे. दोन वर्षांनंतर दिवाळी निर्बंधमुक्त होत आहे. गणेशोत्सव आणि दसऱ्यापासून इच्छुकांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नाना युक्त्या वापरण्यास सुरुवात झाली. सहली, होममिनिस्टर, विनामूल्य देवदर्शन असे सुरू झालेल्या कार्यक्रमांचे स्वरूपही दिवाळी जवळ येताच बदलण्यास सुरुवात झाली. वैयक्तिक भेटीगाठी, समाजमाध्यमातून शुभेच्छा, गरीब, वंचित घटकांसाठी दिवाळीच्या फराळासह जीवनावश्यक वस्तूंचे रास्त दरात किंवा विनामूल्य वाटप आणि वितरण करण्याची तयारी सुरू झाली आहे. दिवाळीनिमित्त पहाटेचे सांस्कृतिक कार्यक्रमही मतदारांसाठी ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रभागांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीत वीजकपातीची स्थिती कायम ; चार नव्या विद्युत उपकेंद्रांसाठी कार्यवाही- उदय सामंत

दरम्यान, शहरात दोन दिवस पावसाने धुमाकूळ घातल्यावर राजकीय पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याची नामी संधी साधली आहे. नुकसानग्रस्तांना मदतीसाठी राजकीय पक्ष सरसावले. नुकसानग्रस्त भागांचे दौरे, महापालिका अधिकाऱ्यांची भेट, निवेदने आणि पाहणी दौऱ्यांचे आयोजन राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आले असल्याने निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांना मतदारांचा कळवळा आल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा >>>पुणे : चोरीचा जाब विचारल्याने दुकानदाराला बेदम मारहाण ; मंगळवार पेठेतील घटना

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने यासंदर्भात आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांची मंगळवारी भेट घेतली होती. मेट्रो, स्मार्ट सिटी, समान पाणीपुरवठा अशी विविध विकासकामे शहरात सुरू आहेत. या कामांमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे का? त्याची माहिती घेण्यासाठी स्वतंत्र संस्थेची नियुक्ती करावी. आपत्कालीन कक्षामधील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, या कक्षासाठी पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या शिष्टमंडळाकडून करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुधवारी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करण्यात आला.

हेही वाचा >>>पुणे : पावसामुळे वाहनांमध्ये बिघाड, दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये गर्दी

पुणे रेल्वे स्थानकासमोरील भुयारी मार्गाच्या आतील असलेल्या गाळेधारकांचे पावसात अतोनात नुकसान झाले आहे. व्यावसायिकांचे साहित्य वाहून गेले आहे. त्यामुळे या गाळेधारकांच्या समस्यांची तातडीने सोडवणूक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. प्रवक्ता अंकुश काकडे, माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, शहर प्रवक्ता प्रदीप देशमुख, किशोर कांबळे, मयूर गायकवाड, अजिंक्य पालकर, महेश हांडे, शशिकांत जगताप, गणेश नलावडे यांनी ही पाहणी केली.