पुणे : राज्य परीक्षा परिषदेतर्फे डीएल.एड. (द्वितीय वर्ष) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) एकाच वेळी होणार आहे. त्यामुळे, दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची आता अडचण झाली असून, डीएल.एड. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, डीएल.एड.ची परीक्षा १० ते १८ जानेवारी या कालावधीत होणार आहे. तर, सीबीएसईतर्फे सीटीईटी ९ ते १३ जानेवारी या दरम्यान होणार आहे. राज्यातील अनेक उमेदवारांनी दोन्ही परीक्षांसाठी अर्ज भरले आहेत. दोन्ही परीक्षांचा कालावधी समान असल्याने दोन्ही परीक्षा देणे उमेदवारांना अडचणीचे होणार आहे. त्यामुळे, आता परीक्षेचा प्रश्न उमेदवारांसमोर निर्माण झाला आहे.

हेही वाचा – जी-२० परिषदेसाठीची कामे रखडली, आयुक्तांचा कारवाईचा इशारा; समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना डीएल.एड. परीक्षा पुढे ढकलण्याबाबत पत्र दिले आहे. सीटीईटी आणि डीएल.एड. परीक्षेला असलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून डीएल.एड. परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश परीक्षा परिषदेला देण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dled ctet exam same time demand to postpone dled exam ccp 14 ssb