लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पिंपरी: वाकड येथील गृहनिर्माण सोसायटी परिसरातून वाहणाऱ्या नैसर्गिक ओढ्यात मैला, सांडपाणी सोडू नये. सांडपाणी सोडणे तत्काळ बंद करावे, अशा सूचना चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

वाकडमधील सहा ते सात गृहनिर्माण संस्थाच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याला नाल्याचे स्वरुप आले आहे. सांडपाणी सोडले जात असल्याने  दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. याची तक्रार नागरिकांनी केली होती. त्यानुसार आमदार जगताप यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह नाल्याची पाहणी केली. माजी नगरसेवक विनायक गायकवाड, संदीप कस्पटे, संतोष कलाटे, रणजीत कलाटे, महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता विलास देसले उपस्थित होते.

आणखी वाचा- आकाशवाणी पुणे केंद्राच्या बातम्यांचे शनिवारपासून ‘विविध भारती एफएम’वर प्रसारण

ओढ्याला नाल्याचे स्वरुप आले आहे. या नाल्यात सोडण्यात येणारे सांडपाणी तात्काळ बंद करावे. नाल्यावर बांधण्यात आलेले शौचालय काढावे. त्याचप्रमाणे बुजवलेला नाला मोकळा करावा. नाला गाव नकाशाप्रमाणे आहे का? त्याच्यावर कोणी अतिक्रमण केले आहे, याची खात्री करावी. सांडपाण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर  कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार जगताप यांनी दिल्या. 