पिंपरी-चिंचवड शहरात अभ्यास न करताच बीआरटी राबविली जात असल्याचा आरोप करत शिवसेनेने त्याला विरोध केला असून, त्यामुळे पुण्यापाठोपाठ या शहरातही आता बीआरटीचा बोऱ्या वाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्त्याच्या मध्य भागाऐवजी सव्र्हिस रस्त्याच्या उजव्या बाजूने तयार करण्यात आलेली बीआरटीएसची मार्गिका, मर्ज इन व मर्ज आउट, सब वे, अंडरग्राउंड ब्रीज मुळे ही बीआरटीएस जीवघेणी ठरणार असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.
या प्रकल्पातील तांत्रिक दोष दूर करून प्रकल्प राबविताना अपघाताची शक्यता, खासगी वाहने, अवजड वाहने, मर्ज इन-मर्ज आउट, वाहनांची वाढ आदींचा सर्वकष अभ्यास न करता, सुधारणा न करता टक्केवारीसाठी विषय तसाच पुढे नेल्यास शिवसेना आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे व भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सारंग कामतेकर यांनी अॅनिमेशनच्या साहाय्याने बीआरटीएसच्या तांत्रिक दोषांवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी याबाबतचे सादरीकरण महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासमोर केले. त्यानंतर डॉ. परदेशी या प्रकल्पाची तांत्रिक तपासणी करण्याचे आश्वासन दिले. याबाबतची कामतेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी शिवसेनेचे गटनेते श्रीकांत बारणे, शहराध्यक्ष भगवान वाल्हेकर, नगरसेविका आशा शेंडगे, संगीता भोंडवे आदी उपस्थित होते.
कामतेकर म्हणाले, की केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियाना अंतर्गत (जेएनएनयूआरएम) जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने  पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका शहरातील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी बस रॅपिड ट्रान्झिस्ट सिस्टिम (बीआरटीएस) प्रकल्प राबवित आहे. यात पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ४५ किलोमीटरचा बीआरटीएस मार्ग व ९० बसथांबे विकसित करण्यात येत आहेत. दोन्ही शहरातील बीआरटीएस मार्गावर पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएल) यांच्या बस धावणार आहेत. त्याचा कृती आराखडा तयार करण्यासाठी पीएमपीएमएल व महापालिकेने इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्सपोर्टेशेन अॅड डेव्हलेपमेंट पॉलिसी (आयटीडीपी) या संस्थेची मदत घेतली आहे. मात्र, आयटीडीपीने कोणताही अभ्यास न करता सत्ताधाऱ्याच्या दबावाखाली आराखडा तयार केला आहे, असा आरोपीही त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा