“मागील वर्षी करोनाचे संकट असताना देखील विकास कामांना गती देण्याचे काम केले आहे. आता करोना कमी झालाय पण गेलेला नाही. इथं तर पठ्ठ्यानी मास्कच काढून टाकलेला आहे. आहो चायनामध्ये काल परवा लॉक डाऊन करण्याची वेळ आली आहे. करोनाला एवढ लाईटली घेऊ नका, बाबांनो. आमच्यातील एका मंत्र्यांला दोन महिन्यामध्ये तीनदा करोना झाला होता,” असं मंत्र्याचं नाव न घेता अजित पवार म्हणाले.

तसेच “तुम्ही मला दोन वर्षात एकदा तरी विनामास्क पाहिले का? फक्त जेवताना आणि पाणी पिताना मास्क काढतो आणि झोपताना तेवढा मास्क काढतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार कात्रज येथील कार्यक्रमात भाषण करताना म्हणताच उपस्थितमध्ये एकच हशा पिकला. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, या भावनेतून मास्क काढत नसल्याचं अजित पवार म्हणाले.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Video Viral
“आयुष्यात कितीही मोठे व्हा पण वडिलांचे कष्ट कधी विसरू नका” बाप लेकीचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल
raj Rajshekhar emotional letter written to grandfather Rajshekhar
“प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

“अर्थसंकल्प सांगत असताना अनेक जण म्हणाले की, दादा मास्क काढा, तर मी म्हणालो की, माझा आवाज खणखणीत आहे. गमतीचा भाग जाऊ द्या, सर्वांनी मास्क वापरला पाहिजे, आपण सर्वांनी करोना काळात मास्क न घालण्याची आणि काळजी न घेण्याची खूप मोठी किंमत मोजली आहे. अनेक जीवा-भावाची माणसं सोडून गेलीत, त्यामुळे काळजी घ्या”, असं अजित पवार म्हणाले.

“मी आपल्या समोर खुप दिवसांनी विविध कामाच्या निमित्ताने आलो आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्यांवर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडता येईल, हा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहरातील वाहतुकीचा प्रश्न मिटवण्यासाठी सर्व भागात मेट्रोचं जाळं पसरले पाहिजे, यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. मात्र, यासाठी केंद्राची देखील मदत आवश्यक असून याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे,” असं त्यांनी सागितलं.