लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहरातील पूरस्थिती पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्याची गरजच काय? असे वक्तव्य करणाऱ्या महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांचा सजग नागरिक मंचाने कडक शब्दांत समाचार घेतला आहे. ‘महापालिकेला स्वतःची खासगी मालमत्ता समजू नका,’ अशा शब्दात मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आयुक्तांना सुनावले आहे. पालिका आयुक्तांनी घेतलेल्या अजब भूमिकेचा निषेधदेखील शहरातील स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आला आहे.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
rajesh kshirsagar loksatta news
कोल्हापूर महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार – राजेश क्षीरसागर
Mumbai governor loksatta news
राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण: निर्णय न घेण्याची राज्यपालांची भूमिका खेदजनक, उच्च न्यायालयाची टिप्पणी
aaditya Thackeray
राज्य सरकारकडची थकीत रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करा, आमदार आदित्य ठाकरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
Contract to supply manpower to Vitthal Rukmini Temple Committee cancelled
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला मनुष्यबळ पुरवठा करणारा ठेका रद्द; तक्रारींनंतर मंदिर समितीकडून कारवाई

सिंहगड रोडसह शहरातील विविध भागांत जुलै महिन्यात पूरस्थिती निर्माण का झाली होती, याचा अभ्यास करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी चार सदस्यांची समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल तयार करून तो पालिका आयुक्त डॉ. भोसले यांच्याकडे दिला होता. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा अहवाल आल्यानंतरही गेल्या तीन आठवड्यांमध्ये त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने समितीचा अहवाल आयुक्तांच्या टेबलवर धूळखात पडला असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. पूरपरिस्थितीचा हा अहवाल पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाने आयुक्तांकडे केली होती.

आणखी वाचा- महिलांच्या वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

महापालिका प्रशासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्याची मागणी होत असल्याबाबत पालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांना विचारले असता, त्यांनी हा अहवाल प्रसिद्ध करण्याची गरजच काय? अशी अजब भूमिका घेऊन ही काही चौकशी समिती नव्हती. त्यामुळे या समितीचा अहवाल जाहीर करण्याची आवश्यकता नाही. या अहवालाचा मी अभ्यास करून गरजेनुसार प्रसारमाध्यमांना त्याची माहिती देईन, असे स्पष्टपणे सांगून त्यावर अधिक बोलणे टाळले होते.

महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या या भूमिकेचा शहरातील स्वयंसेवी संस्थांनी निषेध व्यक्त करून कडक शब्दांत आयुक्तांना सुनावले आहे. ‘आपण सनदी नोकर आहात महापालिकेचे मालक नाही’, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेचा वेळ, पैसा व साधनसामग्री वापरून हा अहवाल तयार केला आहे. हे सर्व जनतेच्या करांच्या पैशातून झाले आहे. हा अहवाल पुण्यातील जनतेच्या जीवित आणि वित्त याच्याशी संबंधित असल्याने हा अहवाल व त्यानुसार महापालिका करत असलेल्या उपाययोजना यांची संपूर्ण माहिती मिळण्याचा पुणेकर करदात्या नागरिकांना पूर्ण हक्क आहे. पालिकेला स्वत:ची मालमत्ता समजू नका, अशा शब्दांत वेलणकर यांनी आयुक्तांना खडे बोल सुनावले. आता तरी लोकशाही तत्त्वांची बूज राखून ज्या जनतेच्या पैशातून हा अहवाल तयार केला गेला त्या पुणेकर जनतेला हा अहवाल तसेच त्यावरील महापालिकेने केलेली कार्यवाही समजावी, यासाठी हा अहवाल तातडीने पालिकेच्या संकेतस्थळावर टाकावा, अशी मागणीही वेलणकर यांनी केली आहे.

आणखी वाचा-लोकजागर : पुण्यात ‘खड्ड्यांची सत्ता’

पालिका आयुक्त नोकर आहेत. मालक नाहीत. हा अहवाल तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पालिकेचा वेळ, पैसा व साधनसामग्री वापरली. हे सर्व काम करदात्यांच्या पैशातून झाले आहे. पूर कशामुळे आला, हे नागरिकांना समजणे आवश्यक आहे. अहवाल देण्याची गरज काय? असे वक्तव्य पालिका आयुक्तांना शोभणारे नाही. -विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

Story img Loader