पुणे : पत्नीशी सुरू असलेल्या वादात धार्मिक तोडग्याचे आमिष दाखवून कोंढवा भागातील एका डॉक्टरची पाच कोटी ३७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका ६७ वर्षीय डॉक्टरने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार डॉक्टर कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर राहायला आहेत. याप्रकरणी सादिक अब्दुलमजीद शेख, यास्मिन सादिक शेख, एहतेशाम सादिक शेख, अम्मार सादिक शेख, राज आढाव ऊर्फ नरसू यांच्याविरुद्ध फसवणूक, तसेच अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार डॉक्टर सौदी अरेबियात ३० वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत होते. त्यांनी तीन विवाह केले आहेत. सन २०१८ मध्ये ते पुण्यात वास्तव्यास आले. त्यांची पत्नी सध्या त्यांच्याबरोबर राहायला आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर आणि पत्नीत वाद सुरू होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली.

हेही वाचा…Video: ऐतिहासिक घोरपडे घाट…जुन्या पुण्याची गोष्ट सांगणारा अमूल्य वारसा!

डॉक्टर प्रार्थनास्थळात गेले. त्या वेळी त्यांची आरोपींशी ओळख झाली. त्यानंतर कौटुंबिक वादात धार्मिक तोडग्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. तोडगा केल्यानंतर स्वर्गप्राप्ती होईल, असे आमिष दाखविले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Story img Loader