पुणे : एका ज्येष्ठ नागरिकाला हृदयविकाराचा झटका आला. हा झटका एवढा तीव्र होता, की त्याच्या हृदयातील डावे निलय फाटले. यामुळे ज्येष्ठाच्या हृदयाची स्थिती गुंतागुंतीची बनली. या स्थितीत उपचार करून ते यशस्वी होण्याची शक्यता केवळ दोन टक्के होती. मात्र डॉक्टरांनी उपचाराचे अचूक नियोजन आणि अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करून ज्येष्ठाला जीवदान दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> किनारपट्टी, विदर्भात मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज

एका ६९ वर्षीय ज्येष्ठावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. तीव्र हृदयविकाराचा झटका, हृदयातून अचानक थांबलेला रक्तपुरवठा आणि डावे निलय फाटल्यामुळे गुंतागुंत निर्माण झाली होती. हृदयाच्या अशा गुंतागुंतीच्या स्थितीत रुग्ण जगण्याचा दर फक्त दोन टक्के असतो. या रुग्णाला रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. या स्थितीत हृदयातील स्नायू अत्यंत नाजूक असल्याने अँजिओप्लास्टी किंवा थ्रॉम्बोलिसिससारख्या पारंपरिक प्रक्रिया अशक्य होत्या. याचबरोबर तातडीने शस्त्रक्रिया करणेही शक्य नव्हते.

हेही वाचा >>> डाळिंबावर तेल्या रोगाचे संकट; दुष्काळी पट्ट्यातील सततच्या पावसाचा परिणाम

डॉक्टरांच्या पथकाने सर्व तपासण्या करून उपचाराचे नियोजन केले. पुढील चार दिवस अतिदक्षता विभागात रुग्णाला ठेवून त्याची प्रकृती स्थिर करण्यात आली. रुग्णाच्या तपासण्यांमध्ये मुख्य धमन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळा असल्याचे निष्पन्न झाले होते. यामुळे बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर रुग्णावर बायपास शस्त्रक्रिया करून त्याच्या हृदयाच्या डाव्या निलयातील फाटलेली बाजू दुरुस्त करण्यात आली.

हृदयाचे डावे निलय फाटले असेल तर रुग्ण दगावण्याची शक्यता ९८ टक्के असते. शस्त्रक्रियेद्वारे तो वाचण्याची शक्यता केवळ २ टक्के असते. वैद्यकीय उपचारांचे अचूक नियोजन केल्याने आम्ही रुग्णाचा जीव वाचवू शकलो. – डॉ. स्मृती हिंदारिया, हृदय शल्यचिकित्सक, रूबी हॉल क्लिनिक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor successfully performed complicated surgery and gave a new life to elderly person pune print news stj 05 zws
Show comments