भारती विद्यापीठाचा पंधरावा पदवीदान समारंभ बुधवारी (१५ जानेवारी) होणार असून या वेळी भारतरत्न डॉ. सी.एन.आर. राव यांना ‘डॉक्टरेट’ आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘डि.लिट’ देण्यात येणार आहे, अशी माहिती भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
भारती विद्यापीठाचा पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या धनकवडी येथील शिक्षण संकुलामध्ये १५ जानेवारीला सकाळी सव्वाअकरा वाजता होणार आहे. या वेळी नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव स्नातकांना मार्गदर्शन करणार आहेत. या समारंभाला भारती विद्यापीठाचे कुलपती आणि वनमंत्री पतंगराव कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या पदवीदान समारंभामध्ये ६ हजार २५४ विद्यार्थ्यांना पदवी आणि ३९ विद्यार्थ्यांना पीएच.डी. देण्यात येणार आहे, तर २९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देण्यात येणार आहेत.
डॉ. सीएनआर राव आणि आशा भोसले यांना भारती विद्यापीठाकडून डॉक्टरेट
भारतरत्न डॉ. सी.एन.आर. राव यांना ‘डॉक्टरेट’ आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘डि.लिट’ देण्यात येणार आहे, अशी माहिती भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांनी दिली.
First published on: 10-01-2014 at 02:58 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctorate to asha bhosale and dr cnr rao by bharati vidyapeeth