भारती विद्यापीठाचा पंधरावा पदवीदान समारंभ बुधवारी (१५ जानेवारी) होणार असून
भारती विद्यापीठाचा पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या धनकवडी येथील शिक्षण संकुलामध्ये १५ जानेवारीला सकाळी सव्वाअकरा वाजता होणार आहे. या वेळी नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव स्नातकांना मार्गदर्शन करणार आहेत. या समारंभाला भारती विद्यापीठाचे कुलपती आणि वनमंत्री पतंगराव कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या पदवीदान समारंभामध्ये ६ हजार २५४ विद्यार्थ्यांना पदवी आणि ३९ विद्यार्थ्यांना पीएच.डी. देण्यात येणार आहे, तर २९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देण्यात येणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा