पुणे : कोलकत्यामधील वैद्यकीय महाविद्यालयातील महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्यात आल्याच्या घटनेचे देशभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. या निमित्ताने डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर चार दिवसांपासून संपावर असून, आता इंडियन मेडिकल असोसिएशननेही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित संप पुकारला आहे. देशभरातील डॉक्टर शनिवारी संपावर जाणार असून, अत्यावश्यक वगळता इतर वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) मुख्यालयाने याबाबत पत्र काढले आहे. त्यात असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आर. व्ही. अशोकन आणि मानद सचिव डॉ. अनिलकुमार नायक यांनी कोलकत्यातील घटनेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कोलकत्यातील घटनेचा तपास योग्य रीतीने करण्यात आला नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. कोलकत्यातील रुग्णालयावरही हल्ला करण्यात आला असून, त्यात पुरावे नष्ट झाले असण्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

आणखी वाचा-केवळ ३ तासांत १०३३ किलोमीटर प्रवास करून फुफ्फुस पुण्यात पोहोचले अन् प्रत्यारोपण यशस्वी झाले!

डॉक्टरांवरील हल्ले वाढले असून, महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही उपस्थित झाला आहे. यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील आधुनिक वैद्यक पद्धतींचा अवलंब करणारे डॉक्टर शनिवारी (ता. १७) पहाटे ६ ते रविवारी (ता. १८) पहाटे ६ वाजेपर्यंत संपावर असतील. या कालावधीत डॉक्टर बाह्य रुग्ण सेवा बंद ठेवतील. याच वेळी अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू राहतील, असे असोसिएशनने नमूद केले आहे.

असा असेल डॉक्टरांचा संप

संपाचा कालावधी – शनिवारी पहाटे ६ ते रविवारी पहाटे ६
बाह्य रुग्ण सेवा (ओपीडी) – बंद
अत्यावश्यक वैद्यकीय सेवा – सुरू
नियोजित शस्त्रक्रिया – बंद
अत्यावश्यक शस्त्रक्रिया – सुरू

आणखी वाचा-‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेच्या लाभार्थ्यांना रक्कम वितरणास शनिवारपासून प्रारंभ

गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलण्याची मागणी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारांकडे करीत आहोत. त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने आम्हाला संपाचे पाऊल उचलावे लागले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सुरक्षा उपाययोजनांसाठी सरकारने ठोस पावले तातडीने उचलावीत. याचबरोबर नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देताना राष्ट्रीय वैद्यक परिषदेने सुरक्षेच्या अंगानेही विचार करावा. -डॉ. शिवकुमार उत्तुरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन

पुण्यातील डॉक्टरांचाही सहभाग

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेने या संपात सहभाग घेतला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजन संचेती आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे डॉ. संजय पाटील यांनी शहरातील सर्व डॉक्टर आणि रुग्णालयांना या संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शहरातील रुबी हॉल क्लिनिकसह सर्व मोठी रुग्णालये या संपात सहभागी होणार आहेत. या रुग्णालयांमध्ये बाह्य रुग्ण सेवा बंद असेल आणि केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असेल.