पुणे : लसीकरणासाठी आणलेल्या श्वानाचा गळफास लागून मृत्यू झाल्या प्रकरणी दोन पशुवैद्यकीय तज्ज्ञांसह चौघांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पाषाण परिसरातील एका पेट क्लिनिकमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी डाॅ. संजीव राजाध्यक्ष, डाॅ. शुभम राजपूत यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेकडे हनी नावाचा लॅब्रोडर श्वान होता. वार्षिक लसीकरण आणि नखे कापण्यासाठी (नेल ट्रिमिंग) महिला श्वानाला घेऊन पाषाण परिसरातील विगल्स माय पेट क्लिनिकमध्ये १७ नोव्हेंबर रोजी आले होते. तिने लसीकरण, तसेच नखे कापण्यासाठी श्वानाला डाॅक्टरांकडे सोपविले. डाॅ. राजपूत आणि दोन मदतनीसांनी श्वानाला त्यांच्याकडील पट्ट्याने झाडाला बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या वेळी श्वानाला बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पट्ट्याचा गळफास बसला. गळफास घट्ट झाल्याने श्वान कोसळले. त्यानंतर श्वानावर उपचार सुरू करण्यात आले. पंधरा मिनिटांनी श्वानाचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्यानंतर डाॅ. राजाध्यक्ष आणि डाॅ. राजपूत काही न सांगता बाहेर पडले, असे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा – पिंपरी : सात लाचखोर कर्मचारी पुन्हा सेवेत, ‘यांच्या’ शिफारशीवरुन घेतला निर्णय

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील ३० हजार इलेक्ट्रिक वाहनचालक हैराण! ‘हे’ आहे कारण

श्वानाचा मृत्यू डाॅक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे तक्रारदाराने फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चतु:शृंगी पोलीस तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dog died after hanging in pet clinic the incident took place in a pet clinic in pashan area pune print news rbk 25 ssb