या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत असलेला लाडका श्वान ‘लिओ’चा आजारपणाने मृत्यू झाला आहे. लिओने मेफेड्रोनसह अमली पदार्थांचा साठा पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शोकाकुल वातावरणात सलामी गार्डने लिओला अखेरची मानवंदना दिली.

लॅब्रोडोर जातीच्या लिओचा जन्म जुलै २०१६ मध्ये झाला. तो चार महिन्यांचा असताना, सप्टेंबर २०१६ मध्ये, पुणे पोलीस दलातील श्वानपथकात त्याचा समावेश करण्यात आला. त्यानंतर त्याला प्रशिक्षकाकडून (हँडलर) खडतर प्रशिक्षण देण्यात आले. श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेताना त्याला अमली पदार्थ हुडकणे, तसेच कवायतीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. श्वान प्रशिक्षण केंद्रातील खडतर प्रशिक्षण पूर्ण करण्यात आल्यानंतर त्याचा समावेश गुन्हे शाखेतील अमली पदार्थविरोधी पथकात करण्यात आला होता.

हेही वाचा >>> पुण्यातील मावळमध्ये हॉटेल मालकाने केली ग्राहक मित्राची हत्या; वेटर सोबत झाले होते वाद!

गेल्या आठ वर्षांपासून लिओ गुन्हे शाखेत कार्यरत होता. सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोरमधील एका शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती. या शेतातून ७० किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या कारवाईत लिओ सहभागी झाला होता. त्याने एका नायजेरियन तस्कराकडून गांजा, तसेच मेफेड्रोनचा साठा पकडून दिला होता. २०१९ मध्ये कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नायजेरियन नागरिकाकडून अमली पदार्थ आणि ५० किलो गांजा जप्त करण्यात लिओची महत्त्वाची भूमिका होती.

हेही वाचा >>> आमदार होताच कार्यकर्त्यांनी घेतला ‘हा ‘ मोठा निर्णय ! नवनिर्वाचित आमदारांच्या शुभेच्छांचे शहरभर फलक, प्रशासनाकडून कारवाईचा फक्त देखावा

लिओचा नियमित तपासणीत सहभाग पुणे रेल्वे स्थानक, तसेच बसस्थानक, येरवडा कारागृहात नियमितपणे अमली पदार्थांची तपासणी करण्यासाठी लिओला नेण्यात यायचे. अन्य श्वानाच्या तुलनेत लिओची घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असल्याने त्याचा फायदा पोलिसांना झाला होता. विविध शाळा, तसेच लष्कराच्या कार्यक्रमात लिओ सहभागी व्हायचा.