आगामी काळात राष्ट्रवादी एकत्र आली तर आश्चर्य वाटू देऊ नका, असं विधान अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी केले आहे. ते मावळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सहा महिन्यांपूर्वी जे नेते अजित पवारांवर टीका करत होते. भर सभेत म्हणत होते. काका मला वाचवा, आता तेच नेते दादा मला वाचवा असं म्हणत आहेत.
हेह वाचा – पुण्यात साकारला अनोखा विश्वविक्रम…
सुनील शेळके म्हणाले, पोपट मेला पण सांगायचं कुणी, अशी ग्रामीण भागात म्हण आहे. अशी परिस्थिती राष्ट्रवादी शरद पवारांच्या नेत्यांची झाली आहे. पुढे ते म्हणाले, अजित पवारांना पुढे करण्याचा प्रयत्न काही शरद पवारांचे नेते करत आहेत. पुढे ते म्हणाले, आगामी काळात राष्ट्रवादी एक संघ होत असेल आणि हातात हात घालून काम करत असेल तर आम्हाला देखील आनंद आहे. परंतु, अडचणींच्या काळात अजित पवारांसोबत राहिले त्यांना देखील विश्वासात घेतले पाहिजे. आमच्यासोबत जे कोणी येतील त्यांचं स्वागत करू, अस देखील शेळके यांनी अधोरेखित केले आहे.