पुतळ्यांची नको, जिवंत माणसांची चिंता करा अशी खोचक टीका भाजपचे त्रिपुरा प्रभारी सुनील देवधर यांनी आज कम्युनिस्ट पक्षावर केली आहे. ते आज पुण्यात आयोजित, पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. त्रिपुरात भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयात सुनील देवधर यांचा मोलाचा वाटा होता. भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयानंतर त्रिपुरात लेनिन यांचा पुतळा पाडण्याची घटना घडली होती. या घटनेनंतर देशभरात मुर्ती आणि पुतळ्यांच्या विटंबनाचं सत्र सुरु झालं. तामिळनाडूत पेरियार स्वामी, उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, औरंगाबादेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात आली. मात्र त्रिपुरात पुतळा पाडण्याची घटना घडली त्यावेळी भाजपचे नाही तर कम्युनिस्ट पक्षाचे सरकार होते असं म्हणतं, देवधर यांनी या घटनेला कम्युनिस्ट सरकारला जबाबदार धरलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा