अभिनेत्री तनुश्री दत्ताने मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर घणाघाती आरोप केले. राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती ती मिळाली नाही म्हणून ते गुंडगिरी करत आहेत असे तनुश्री दत्ताने म्हटले होते. यानंतर मनसेने हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान मंगळवारी म्हणजेच आज तनुश्री दत्ताच्या बेताल वक्तव्याचा निषेध करत लोणावळा येथील मनसे विद्यार्थी सेनेने बिग बॉस या कार्यक्रमाच्या सेटवर जात तनुश्री दत्ताला बिग बॉसमध्ये प्रवेश दिला तर स्टेज उखडून टाकू असा इशारा दिला. एवढंच नाही तर तनुश्री दत्ता बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी इथे आली तर लोणावळा शहरतर्फे बिग बॉसला धडा शिकवण्यात येईल. तनुश्रीला प्रवेश दिला तर जे काही परिणाम होतील त्याची जबाबदारी कलर्स वाहिनीची असेल असाही इशारा यावेळी देण्यात आला. तसेच यावेळी तनुश्री दत्ताला सेटवर प्रवेश देऊ नये यासंदर्भात एक पत्रही देण्यात आले.

यावेळी मनविसे लोणावळा शहराध्यक्ष अक्षय जाचक, अविनाश जांभुळकर, विजय भानूसघरे, महिला आघाडी अध्यक्ष संगीताताई गुजर, संतोष शिंत्रे, सरपंच संतोष खराडे, सागर शेरकर, सुमित उके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont give entry to tanushree dutta in big boss program mns letter to big boss set
Show comments